Source- loksatta.com
date - 23 March 2010
link-http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=56593:2010-03-22-15-22-18&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7
ब्रह्मपुत्रा ते मॉस्क्वा
मंगळवार, २३ मार्च २०१०‘तुम्ही किती बलाढय़ राष्ट्राशी वा कोणत्या शस्त्राने मुकाबला करता हे महत्वाचे नसते. तर तुमच्याकडे असलेले शस्त्र तुम्ही किती नावीन्यपूर्ण पद्धतीने वापरता यावर तुमचे यश अवलंबून असते.’ सामरिकशास्त्रातील एक महत्वाचा पाठ वर्षांनुवर्षे अनेकांना या वाक्यातून मिळालेला आहे. रविवारी भारतीय संरक्षण दलातर्फे करण्यात आलेल्या ‘ब्राह्मोस’ या स्वनातीत म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर सामरिक शास्त्रातील हे वाक्य, त्यातून मिळणारा धडा या दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत. भारतीय संरक्षण दलांच्या दृष्टीने ८० आणि ९० ची दशके ही काहीशी थंडावलेल्या अवस्थेत होती. मात्र ९० नंतर संरक्षण दलांनी तंत्रज्ञानाच्या बाबतीत कात टाकण्यास सुरुवात केली, त्याचे पहिले प्रत्यंतर कारगिलच्या ‘मर्यादित युद्धा’मध्ये पाहायला मिळाले. याच काळात जगभरात भारतीय माहिती तंत्रज्ञानाचा बोलबाला सुरू होता. या क्षेत्रात भारतीय तज्ज्ञांनी घेतलेल्या खूप मोठय़ा आघाडीचा फायदा संरक्षण दलांना झाला. नौदलाच्या बाबतीत बोलायचे तर ८० व ९०ची दशके ही ‘मृत दशके’ गणली जातात. मात्र त्यानंतर नौदलाने पुन्हा एकदा जोरदार भरारी घेण्यास सुरुवात केली आहे. भारतीय नौदलाचा क्रमांक जगभरात तिसरा आहे, असे मानले जाते. भारतीय लष्करही अनेक आघाडय़ांवर पुढे आहे. एका बाजूला संरक्षण दलांमध्ये हे सारे होत असताना दुसरीकडे जगभरातही अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. २००१च्या ११ स्प्टेंबरचा दहशतवादी हल्ला झाला आणि अलिकडेच सव्वा वर्षांपूर्वी मुंबईतही जगातील सर्वात मोठा, दीर्घकाळ चाललेला असा दहशतवादी हल्ला झाला. या पाश्र्वभूमीवर रविवारी पार पडलेली ब्राह्मोसची चाचणी यशस्वी होणे याला एक वेगळे महत्त्व आहे. इतर कोणत्याही क्षेपणास्त्राची चाणणी यशस्वी होणे व ब्राह्मोसच्या या नव्या चाचणीला यश मिळणे यात मोठे अंतर आहे. ‘चाचणी यशस्वी’ यापेक्षाही मोठी बातमी त्यात दडलेली आहे. त्यासाठी ब्राह्मोसच्या तांत्रिक बाबी समजून घ्याव्या लागतील. ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हा भारत व रशिया यांचा संयुक्त उपक्रम आहे. त्यासाठी ब्राह्मोस एरोस्पेसची स्थापना संयुक्तपणे करण्यात आली आहे. मॉस्क्वा ही रशियातील, तर ब्रह्मपुत्रा ही भारतातील मोठी नदी. या दोन्ही नद्यांच्या अक्षरांतील सुरुवातीची दोन अक्षरे घेऊन ‘ब्राह्मोस’ हे नाव या क्षेपणास्त्राला देण्यात आले. हे स्वनातीत वेगात जाणारे क्षेपणास्त्र आहे. रविवारी चाचणी यशस्वी झालेल्या ‘ब्राह्मोस’चा वेग २.८ मॅक म्हणजेच ध्वनीच्या वेगाच्या साधारणपणे तिप्पट एवढा होता. स्वनातीत वेगात जाणारी क्षेपणास्त्रे जगभरात एका हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच आहेत. त्यातही ती वेगाने जाऊन नेमका लक्ष्यभेद करू शकतात, हेच त्यांचे वैशिष्टय़ आहे. मात्र ‘ब्राह्मोस’च्या या नव्या आवृत्तीच्या चाचणीचे वैशिष्टय़ असे होते की, हे क्षेपणास्त्र नियंत्रित करता येते. म्हणजे ते डागण्यात आल्यानंतरही लक्ष्य निश्चित करून त्यात बदल करता येतात. एखादी गोष्ट वेगात असताना वळविणे अशक्य असते. ताशी २५० किलोमीटर्सच्या वेगाने जाणारी गाडी मध्येच वळविणे जेवढे अशक्य असते, त्याहूनही अनेक पटींनी अधिक अवघड काम क्षेपणास्त्र वळविण्याचे असते. २.८ मॅक या वेगात असतानाही मार्ग बदल करण्याची प्रचंड क्षमता असलेले ब्राह्मोस हे आता जगातील पहिलेच क्षेपणास्त्र ठरले आहे. त्यामुळेच या यशस्वी चाचणीमुळे या क्षेपणास्त्राच्या संशोधन व विकासकार्यात गुंतलेल्या वैज्ञानिकांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. हे यश जागतिक पातळीवरही अनन्यसाधारण महत्त्वाचे असल्यानेच अमेरिकेसह जगभरातील अनेक राष्ट्रांचे लक्ष ‘ब्राह्मोस’च्या या चाचणीकडे लागलेले होते. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हे यश हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या चाचणीचा दुसरा भागही तेवढाच महत्त्वाचा आहे. ‘ब्राह्मोस’ची पहिली आवृत्ती यापूर्वीच लष्करात आणि नौदलातही दाखल झाली आहे. सध्या नौदलामध्ये तलवार वर्गातील स्टेल्थ युद्धनौकांवर ब्राह्मोस बसविण्यात आले आहे. मात्र त्याची यंत्रणा ही एका विशिष्ट दिशेने निश्चित (इन्क्लाइंड लाँचर) करण्यात आलेली अशी यंत्रणा आहे. त्यात बदल करता येत नाही. त्यात बदल करायचा तर युद्धनौका वळवावी लागते. मात्र रविवारी चाचणी घेण्यात आलेले ‘ब्राह्मोस’ हे व्हर्टिकल लाँचरमधून डागण्यात आले होते. या प्रकारामध्ये क्षेपणास्त्राला लक्ष्यभेद करण्यास लागणारा वेळ हा कमीत कमी असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डागल्यानंतर ते ३६० अंशाच्या कोनात कुठेही फिरवता येऊ शकते. यापुढे भारतीय युद्धनौकांवर अशाप्रकारे व्हर्टिकल लाँचरमध्ये ब्राह्मोस बसविण्यात येणार आहेत. ‘ब्राह्मोस’च्या नव्या आवृत्तीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्याचा वेध घेण्यासाठी शत्रूला अधिक वेळ लागेल. त्याचा वेग आणि त्यावर असलेले स्टेल्थ आवरण ही त्याची दोन कारणे आहेत. क्षेपणास्त्र शत्रूच्या लक्षात येईपर्यंत बचावाची वेळ निघून गेलेली असेल. केवळ एवढेच नव्हे, तर क्षेपणास्त्र वेगात वळविण्याच्या नव्या क्षमतेमुळे ते नेमके कुठून डागले आहे, हे शोधणे शत्रूला कठीण जाणार आहे. त्यामुळे शत्रूला अधिक चांगला चकवा देता येईल. ही नावीन्यपूर्ण क्षमता हे या क्षेपणास्त्राचे मोठे बलस्थान ठरणार आहे. भारतीय व रशियन संशोधकांचे हे खूप मोठे यश आहे. येणाऱ्या काळात ५.२६ मॅक या वेगाने जाणाऱ्या ब्राह्मोसच्या नव्या आवृत्तीची चाचणी आपण घेणार आहोत. ती चाचणी यशस्वी झाल्यास ते जगातील सर्वात वेगवान हायपरसॉनिक क्षेपणास्त्र असेल. रविवारी चाचणी झालेली ब्राह्मोसची नवीन आवृत्ती काही काळात भारतीय संरक्षण दलात दाखल होईल. भारतीय संरक्षण दलाच्या दृष्टीने या आवृत्तीला एक वेगळे महत्त्व आहे. पाकिस्तानामध्ये सीमावर्ती भागात लष्कर-ए-तय्यबाची अनेक प्रशिक्षण केंद्रे असल्याचा आरोप आजवर अनेकदा भारताने केला असून ही दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त करण्याची मागणीही सरकारने अनेकदा केली आहे. आता पाकिस्तानी हद्दीमध्ये प्रवेश करून ही प्रशिक्षण केंद्रे नेमकी उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी पार पाडण्याची क्षमता ब्राह्मोसच्या या नव्या आवृत्तीमध्ये आहे. नेमका लक्ष्यभेद हे याचे वैशिष्टय़ आहे. या शिवाय अलिकडे शहरांमध्ये होणारे दहशतवादी हल्ले वाढले असून येणाऱ्या काळात हीच भीती सर्वाधिक असल्याचे बोलले जाते. या पाश्र्वभूमीवरही ब्राह्मोसच्या नव्या आवृत्तीला विशेष महत्त्व आहे. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही जाहीर वक्तव्य केले होते की, यापुढे भारतामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यास भारत केवळ बघ्याची भूमिका घेणार नाही. ‘ब्राह्मोस’च्या या चाचणीला पंतप्रधानांच्या या वक्तव्याचीही पाश्र्वभूमी आहे. ब्राह्मोसचे हे यश भारताएवढेच रशियासाठीही खूप महत्त्वाचे आहे. मात्र त्याकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले आहे. रशियन संघराज्याचे विघटन झाल्यानंतर रशिया अनेक क्षेत्रांमध्ये कोसळला. विज्ञान-तंत्रज्ञान व संरक्षण ही त्यातील दोन महत्त्वाची क्षेत्रे. त्यापूर्वी जगात फक्त दोन प्रबळ राष्ट्रे होती- अमेरिका व रशिया. त्यांच्यामधील शीतयुद्धाची नोंद जगाने घेतली. ब्राह्मोससाठी भारताशी केलेला सहकार्य करार हा आत्मविश्वास मिळवण्यासाठीचा रशियाचा एक महत्त्वाचा मार्ग होता. ब्राह्मोसच्या यशस्वी चाचणीने रशियन संशोधकांना तो आत्मविश्वास पुन्हा मिळवून दिला आहे. रशिया हा भारताचा जुना मित्र आहे. मध्यंतरीच्या काळात रशियालाच अनेक क्षेत्रांत मदतीची गरज भासली. आता ब्राह्मोसच्या निमित्ताने ही मदत करत भारताने मैत्रीचा नवा अध्याय आपल्या बाजूने लिहिला असून शेजारधर्म पाळला आहे. काही वर्षांपूर्वी राहुल सांस्कृत्यान यांचे ‘व्होल्गा ते गंगा’ हे पुस्तक सर्व भारतीय भाषांमध्ये गाजले होते आणि त्याच्या अनेक आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. तोच धागा पकडून आपण आजच्या संदर्भात म्हणू शकतो की आता ‘ब्रह्मपुत्रा ते मॉस्क्वा’ या प्रकल्पामुळे नव्या रशियालाही सामरिक सामथ्र्य प्राप्त होणार आहे. पण केवळ ब्राह्मोसच नव्हे तर अनेक पातळ्यांवर भारतीय संरक्षण दलाने आघाडी घेतली आहे. रशियन लढाऊ विमान असलेल्या सुखोईमध्ये भारताने काही महत्त्वपूर्ण बदल केले असून त्याची क्षमता वाढली आहे. अलीकडेच अमेरिकन हवाई दलासोबत पार पडलेल्या युद्धसरावात भारताने अमेरिकन हवाई दलावर मात केली होती. त्यात सुखोईच्या वाढलेल्या क्षमतेचा महत्त्वपूर्ण वाटा होता. भारतीय नौदलाच्या अद्ययावत युद्धनौकांमध्ये अमेरिकेसह जगभरातील अनेक राष्ट्रांना उत्सुकता आहे. कारण त्यात आता ८० टक्के भार सॉफ्टवेअरवर असून त्यामुळे त्यांची क्षमता अनेक पटींनी दुणावली आहे. त्यामुळे युद्ध लढण्यासाठी प्रत्यक्ष सैन्यापेक्षा तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण क्षमता महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. ब्राह्मोसच्या यशस्वी चाचणीने त्याची नांदी केली आहे, इतकेच!