Sunday, January 21, 2018

मराठी विनोद - 1

पुरुषांचं आयुष्य
सुखी असण्याची
७ कारणं....

१. त्यांचं आडनाव
आयुष्यभर एकच असतं.

२. त्याचं फोनवरचं
संभाषण ३० सेकंदात
संपतं.

३. ५/६ दिवसांच्या
सहलीसाठी त्यांना
एक जीन्स पुरेशी
असते.

४. कोणी त्यांना
आमंत्रण द्यायला
विसरलं तरीही
त्यांची मैत्री टिकून
राहते.

५. आयुष्यभरासाठी
त्यांची एकच
hair style
टिकून राहते.

६. २५ नातेवाईकांसाठी
खरेदी करायची असेल
तर त्यांना २५ मिनिटे
पुरतात.

७. एखाद्या पार्टीला
गेल्यावर दुसऱ्या
माणसाने same शर्ट
घातलेला बघून त्यांना
मत्सर वाटत नाही.
उलट ते त्या पार्टीत
चांगले मित्र बनून
जास्त एन्जॉय करतात.


थोडक्यात काय तर  ......

पुरुष हे बटाटया
प्रमाणे असतात
कोणत्याही
भाजी बरोबर
एडजेस्ट होतात.

😎😎😎😎
बटाटे कुठले...
--------------------------------------------------------------------------------------------------

 एकजण एका म्हाताऱ्याला
विचारतो की ८० व्या वर्षी पण
तूम्ही  बायकोला
डार्लिंग,
जानु,
स्वीटी,
 बेबी,
 हनी,
 लव्ह!”
 कसं काय बोलता...
या एवढ्या प्रेमाचं गूपीत काय?
😜😜😜
म्हातारं म्हणालं...
कसलं प्रेम अनं कसलं गूपीत
१० वर्षे झाली
म्हातारीचं नाव विसरलोय...
तिला नाव विचारायचं धाडसच होत नाही...
😂😂😂

Jio चा गहू आला आहे बाजारात🤔






एक चपाती खाल्ली की 28 दिवस भूक लागत नाही😜😜😜😅😅😅😅

---------------------------------------------------------------------------------------------------

मास्तर: गोवा हे नाव पोर्तुगीजांनी
दिलेले आहे.. सांगा पाहू गोव्याचे खरे भारतीय नाव काय ?






















गण्या: मद्य प्रदेश

😂😂😂😂
---------------------------------------------------------------------------------------------------
 😜 एका मंदिरात गेलो होतो.

7 साधू 7 चटईवर वेगवेगळे बसले होते...
😯😕😉😯😊😑😩
मी सगळ्यात मोठ्या साधूला नमस्कार 🙏करुन विचारले..

🙏👉बाबा इंजिनीयरिंग केलय पुढे काय करु?

बाबा हसले 😁आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले,...........

"आणखी एक चटई टाक भावासाठी..."😂😝😜😂😂

--------------------------------------------------------------------------------------

शिक्षक: (विद्यार्थ्यांना ) सेमिस्टर चा  फायदा काय?



विद्यार्थ्यी: फायदा काय माहित नाही
पण वर्षातून  दोनदा
आब्रू जाती.