Monday, February 18, 2013

आजचं जग खूप स्पर्धात्मक बनलं आहे. छोटय़ा छोटय़ा गोष्टी साध्य करण्यासाठीसुद्धा बराच संघर्ष करावा लागतो. ध्येय गाठण्यासाठीच्या या स्पध्रेत आपण निश्चयाने सहभागी होतो खरे, पण हीच स्पर्धा आपल्याच एका शत्रूला आमंत्रित करते. तो शत्रू म्हणजे ताण. आपल्या इच्छेविरुद्ध उद्भवणारा हा ताण आपल्या जीवनात न इच्छिलेले बदल घडवून आणतो. राहणीमानातल्या या बदलांमध्ये जेवणाच्या अनियमित वेळा, मधला आहार टाळणं, अख्खी धान्यं, फळं, भाज्या, व्यायाम यांचा दैनंदिनीतला अंतर्भाव अतिशय कमी असणं किंवा अजिबात नसणं. या अनियमिततेमुळे सध्याच्या एका अशा बहुचíचत आजाराला आमंत्रण मिळतं जो महिलांमध्ये आढळतो. तो आजार म्हणजे पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिण्ड्रोम.महिलांच्या सेक्स हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्याने मासिक पाळी अनियमित बनते, अंडाशयामध्ये गाठी निर्माण होतात तर काही दुर्दैवी केसेसमध्ये वंध्यत्वही येतं. पीसीओएस हा विकार आजकाल विशीतल्या तसंच तिशीतल्या तरुण महिलांमध्येही सर्रास आढळू लागला आहे. पीसीओएसशी संबंधित एक सर्वसाधारण आणि कॉमन कारण म्हणजे वजन वाढणं आणि स्थूलपणा.आहाराचं सुयोग्य व्यवस्थापन आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारल्यास वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे हार्मोन्समध्येही संतुलन राखता येतं. पीसीओएसची प्रमुख लक्षणं आणि परिणामांची तीव्रता कमी होऊन हळूहळू ते नष्ट होण्यास मदत होते.आपल्या जीवनशैलीत पुढील बदल घडवून आणा.
१) आहारामध्ये सकस, नसíगक आणि पौष्टिक खाद्यघटकांचा समावेश असावा. ओट्स किंवा भरपूर फायबर असणारे पदार्थ सकाळच्या नाश्त्यात असावेत. त्यानंतर सकाळी खायच्या दुसऱ्या नाश्त्यामध्ये मिश्र भाज्यांच्या सॅलडचा अंतर्भाव करावा. दुपारच्या जेवणात ज्वारी, बाजरी, नाचणीसारख्या कमी जीआय असणाऱ्या धान्यांचा आवर्जून समावेश करावा. दुपारच्या जेवणात यापकी एका धान्याच्या भाकरीसोबत डाळ, भाजी आणि दही असावं. त्यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण संतुलित राहतं. संध्याकाळच्या नाश्त्यात ताज्या भाज्यांच्या रसासोबत अक्रोड, बदाम, पिस्त्यासारखा सुकामेवा खावा. रात्रीचं जेवण सर्वात हलकं असावं. त्यात एक चपाती किंवा वाटीभर ब्राऊन राइस किंवा बाजरीची भाकरी, डाळ आणि मोड आलेल्या कडधान्यांचं सॅलड असावं.
२) तळलेले, भरपूर गोड पदार्थ खाणं टाळावं. त्याऐवजी गाजर, पालक, टोमॅटो, लेट्युस, कारलं, काकडी अशा भाज्यांचा समावेश आहारात करावा. या भाज्या आपल्या शरीरातले विषारी घटक काढून टाकण्यास मदत करतात. त्याच जोडीला अ‍ॅण्टि-ऑक्सिडण्ट असणारी सफरचंद, संत्री, डािळबं, मोसंबी, पेअर, पेरू, पीच ही फळं खावीत.
३) नियमित व्यायाम करावा. योग, अ‍ॅरोबिक्स, काíडओ, चालणं, सायकिलग, पोहणं, श्वासाचे व्यायाम, ध्यानधारणा, प्रार्थना या व्यायामाच्या प्रकारांमुळे शरीर आणि मनही प्रफुल्लित आणि ताजंतवानं होतं. त्यामुळे आपण उत्साही आणि आनंदी बनतो.
४) प्रक्रिया केलेले, डबाबंद खाद्यपदार्थ, एरिएटेड िड्रक्स, मटणाचं अतिसेवन, कॅफिनचं सेवन टाळावं.
५) अख्खी धान्यं, डाळी, हिरव्या भाज्या, इतर भाज्या, दूध, सोया, सोयाचं दूध, सुकामेवा, टोफू हे पदार्थ खावेत. रिफाइण्ड साखर, मदा, चरबीयुक्त पदार्थ, ट्रान्सफॅट्स असणारे वेफर्स, चिप्स, कुकीजसारखे पदार्थ खाणं टाळावं. हे पदार्थ आपल्या शरीरातलं कॅल्शिअम शोषून घेतात. ताण आणि अयोग्य जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या इतर आजारांपासून आपणच आपलं रक्षण केलं पाहिजे. आपली रोगप्रतिकारशक्ती अधिक बळकट केली पाहिजे. ताण आणि अयोग्य जीवनशैलीमुळे पीसीओएससारख्या आजारांना निमंत्रण मिळतं. परंतु वरील उपाय योजल्यास हे आजार टाळता येतात. सकारात्मक आणि आशावादी राहा. ताणाला आपल्यावर स्वार होऊ देऊ नका. ताणावर नियंत्रण मिळण्याची आणि त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या इतर आजारांना पळवण्याची हीच योग्य वेळ आहे.

Source - Loksatta.com
मिकी मेहता
Published: Friday, February 15, 2013

Monday, February 11, 2013

त्रिबंध नाते - कामस्वास्थ्य



सेक्स म्हणजे प्राणिजगतात निर्माण झालेली र्सवकष त्रिबंध (शारीरिक, मानसिक, भावनिक बंध) तत्त्वशक्ती आहे हे ध्यानात घ्यायला हवे. मानवात ती सवार्ंत जास्त उत्क्रांत झाली आहे म्हणून आपण जरी जगात येतो एकटे, जातो एकटे तरी राहतो मात्र या त्रिबंध नात्यातच, हे विसरता कामा नये. म्हणून सेक्सला नाकारून जगणे हे या तिन्ही स्तरांवर समस्या निर्माण करणारे ठरते.