Author - डॉ. शशांक सामक / जेसिका सामक - shashank.samak@gmail.com
सेक्स म्हणजे प्राणिजगतात निर्माण झालेली र्सवकष त्रिबंध (शारीरिक, मानसिक, भावनिक बंध) तत्त्वशक्ती आहे हे ध्यानात घ्यायला हवे. मानवात ती सवार्ंत जास्त उत्क्रांत झाली आहे म्हणून आपण जरी जगात येतो एकटे, जातो एकटे तरी राहतो मात्र या त्रिबंध नात्यातच, हे विसरता कामा नये. म्हणून सेक्सला नाकारून जगणे हे या तिन्ही स्तरांवर समस्या निर्माण करणारे ठरते.
स माजात सेक्सकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळी दूषित असल्याने हा विषय 'टॅबू', त्याज्य, असाच झाला आहे. अनेक पती-पत्नींमध्ये हा विषयच मुळी बोलला जात नाही. म्हणूनच कालांतराने हा विषय काही दाम्पत्यांच्या आयुष्यातून अस्तंगत होऊ लागतो. तसे घडायला लागल्यावर मग त्याचे चटके दाम्पत्य जीवनात जाणवायला लागतात. संपूर्ण नाते वेगवेगळय़ा समस्यांनी ग्रासले जाते. पण त्या सगळय़ांच्या मुळाशी दुर्लक्षित कामजीवन आहे, हे विसरता कामा नये.
'सेक्स' ही निसर्गाने निर्माण केलेली शृंगारिक तत्त्वशक्ती आहे. ही शृंगारिक तत्त्वशक्ती (इरॉटिक ड्राइव, इरॉस) निसर्गाने वासना (पॅशन), आकर्षण (अॅट्रॅक्शन) व भावबंध, नातेनिष्ठा (अॅटॅचमेंट) अशा त्रिमितीमध्ये उत्क्रांत करीत नेली आहे. यालाच आपण शृंगारिक प्रेम म्हणतो. वासना शारीरिक संबंधासाठी, आकर्षण प्रजननासाठी व भावबंध, नातेनिष्ठा हे पालकत्वासाठी अशा हेतूंनी निर्माण केले आहे. गंमत म्हणजे यासाठीच्या मेंदूसंस्थासुद्धा वेगवेगळय़ा निर्माण केल्या आहेत.
वासनेसाठी मेंदूगर्भातील 'हायपोथॅलॅमस' भाग व त्याची लैंगिक पूर्वपीठिका (प्रायिमग) टेस्टोस्टेरॉन या सेक्स हॉर्मोनवर व उत्तेजकता डोपामाइन या रसायनावर अवलंबून असते. लैंगिक पूर्वपीठिका (प्रायिमग) टेस्टोस्टेरॉनमुळे व्यक्ती (स्त्री व पुरुष) वयात येतानाच पौगंडावस्थेत तयार होते. एकदा हे झाले की कामभावनेचे घडय़ाळ स्त्री व पुरुष दोघांमधेही मेंदू जिवंत असेपर्यंत काम करीत राहते. म्हणजेच वयोवृद्ध व्यक्तीलाही कामभावना असणे किंवा होणे हे अत्यंत नसíगकच आहे. ('अवघे पाऊणशे वयमान' किंवा 'चिनी कम' या परिस्थितींचे आश्चर्य वाटायचे कारण नाही!)
आकर्षणासाठी मेंदूतील आनंद-केंद्रे (रिवॉर्ड सिस्टीम : मेडियल इन्शुला, ग्लोबस पॅलीडस, कॉडेट न्यूक्लिअस, व्हिटीए इ.) व डोपामाइन, जास्त ऑक्सिटोसीन, कमी सेरोटोनीन रसायने हे जबाबदार असतात. ऑक्सिटोसीन हे कामचतन्य सळसळवणारे रसायन तर सेरोटोनीन हे त्याला कमी करीत असते. म्हणून शास्त्रज्ञांच्या मते जेवढे ऑक्सिटोसीनची मेंदूतील निर्मिती जेवढी जास्त व त्याच्या जोडीला सेरोटोनीनची कमी असेल तेवढी ती व्यक्तीला अन्य व्यक्तीविषयी वाटणाऱ्या प्रेमाकर्षणाचा संभव, चान्स जास्त असतो. ज्या ज्या औषधांनी मेंदूतील सेरोटोनीनचे प्रमाण वाढत असते अशांमुळे त्या व्यक्तीला अन्य व्यक्तीविषयी वाटणाऱ्या आकर्षणावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे या विषयातील संशोधकांना आढळले आहे. (म्हणून वैद्यकीय व्यावसायिकांनी अशा औषधांचा वापर करताना जागरूक असले पाहिजे.)
भावबंध, नातेनिष्ठा हे मेंदूतील व्हेंट्रल पॅलीडम भाग व व्हाजोप्रेसीन या रसायनाच्या प्रमाणावर अवलंबून असते. व्हाजोप्रेसीनचे व्हेंट्रल पॅलीडम भागात जेवढे जास्त ग्रहणिबदू (रिसेप्टर्स) तेवढय़ा जास्त प्रमाणात जोडीदाराबद्दलची एकनिष्ठता असते, असे शास्त्रज्ञांना आढळले आहे. आधुनिक संशोधनांमध्ये हे लक्षात आले आहे की, व्हाजोप्रेसीन हे नातेनिष्ठा-रसायन आहे. प्रेअरी व्होल व माउंटेन व्होल या प्राण्यांवरील सखोल संशोधनात असे आढळून आले आहे की, व्हाजोप्रेसीनचे ग्रहणिबदू खूप प्रमाणात असणारे प्रेअरी व्होल हे जन्मभर आपल्या साथीदाराबरोबर एकनिष्ठ असतात, तर व्हाजोप्रेसीनचे ग्रहणिबदू खूप कमी प्रमाणात असणारे त्यांचेच जातभाई माउंटेन व्होल हे सर्वकाळ निष्ठाहीन असतात. निसर्गात प्रेअरी व्होलसारखे एकनिष्ठ प्राणीही अत्यंत विरळाच असेही आढळले आहे. अर्थात 'मनुष्यप्राणी'ही 'प्रेअरी व्होल'वर्गात मोडणारा नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही! समाजव्यवस्थेमुळे 'मनुष्यप्राण्या'त ही नातेनिष्ठा आणावी लागते हे खरे, पण मुळात 'मनुष्यप्राणी' हा कामभावात भरकटणारा प्राणी आहे हे शास्त्रीय सत्यही लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून कित्येकदा पुरुषाचा 'स्ट्राँग पॉइंट' त्याची बायको असली तरी 'वीक पॉइंट' दुसरी स्त्री का असू शकते, हे ध्यानात येईल. परंतु मनाला वाटणे व सामाजिक नतिकता (सोशल मोरॅलिटी) या दोन्हींमध्ये कुठे ना कुठे तरी रेघ मारावीच लागते हेही समजून घेतले पाहिजे.
थोडक्यात, 'सेक्स' हे निसर्गाने गंभीरपणे निर्माण केले आहे. त्याची उत्क्रांतीही गंभीरपणे घडलेली आहे म्हणून त्याला गंभीरतेनेच घेतले पाहिजे, शिकले पाहिजे. म्हणजेच शृंगारिकतेची प्रत्येक मिती ही वैशिष्टय़पूर्ण असून निसर्गाने त्या तिन्हींची उत्तम गुंफण केली आहे. त्यामुळे मानवातील कामजीवनात या तिन्हींचा विचार करणे आवश्यक असते. हे समजावून घेतले तर सर्वसामान्यांनाही तसेच या विषयात रस घेणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांनाही या ज्ञानाचा वापर करायला सोपे जाईल.
याचा नीट विचार करून 'सेक्स' म्हणजे केवळ िलग-योनी संबंध वा वीर्यविसर्जनाची क्रिया नसून प्राणीजगतात निर्माण झालेली र्सवकष त्रिबंध (शारीरिक, मानसिक, भावनिक बंध) तत्त्वशक्ती आहे हे ध्यानात येईल. मानवात ती सर्वात जास्त उत्क्रांत झाली आहे म्हणून आपण जरी जगात येतो एकटे, जातो एकटे तरी राहतो मात्र या त्रिबंध नात्यातच, हे विसरता कामा नये. म्हणून सेक्सला नाकारून जगणे हे या तिन्ही स्तरांवर समस्या निर्माण करणारे ठरते. दाम्पत्याचे कामजीवन म्हणूनच वेळेत अस्तंगत होता होता वाचवले पाहिजे. आणि यासाठी त्या पती-पत्नी दोघांनाही कामजीवनाची जागरूकता असणे आवश्यक आहे.
सेक्सचा प्रतिसाद निर्माण होताना वासना केंद्र डोपामाइनने उत्तेजित होते. त्यामुळे 'ऑक्सिटोसीन' रसायन मेंदूत व रक्ताभिसरणातून शरीरात इतरत्र पसरते. त्यामुळे मेंदूतील आनंद-केंद्रांवर, विशेषत: 'न्यूक्लिअस एॅक्युम्बन्स' या भागावर त्याचा परिणाम होऊन तिथे अत्युच्च आनंदक्षणी रासायनिक िबदूंचा स्फोट होऊन एण्डॉíफन, एन्केफेलीन ही रसायने पसरतात. तत्क्षणी आनंद (प्लेझर), सुखद ग्लानी (ट्रान्स), वेदनारहित स्थिती (एॅनॅल्जेसिया) व मन:शांती (पीस) अशा जाणिवांनी 'क्षणिक समाधी' अवस्था प्राप्त होत असते. 'संभोग' हे अशी 'क्षणिक समाधी' देऊन मानसिक ताण नष्ट करणारे (स्ट्रेस बस्टर) नसíगक साधन आहे हे शास्त्रीय सत्य लक्षात घेतले पाहिजे. दैनंदिन आयुष्यात जाणवणारे मानसिक ताण घालवण्यासाठी दाम्पत्याने सेक्स हा 'स्ट्रेस मॅनेजमेंट'चा उत्तम उपाय आहे हे ध्यानात ठेवून आपल्या कामजीवनाकडे दुर्लक्ष करता कामा नये.
रक्ताभिसरणातून शरीरभर पसरणारे 'ऑक्सिटोसीन' जेव्हा हृदयाकडे येते तेव्हा जे विविध परिणाम होतात, त्यात एक महत्त्वाचा म्हणजे हृदयाच्या वरील कप्प्यातून 'एॅट्रीयल नॅट्रीयुरेटरिक पेप्टाइड' हे रसायन उत्पन्न होते. त्यामुळे व 'ऑक्सिटोसीन'ने 'नायट्रिक ऑक्साइड' रसायन निर्माण केल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन त्या रुंदावतात (करोनरी डायलेटेशन), म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा वाढतो. थोडक्यात, 'नसíगक अँजिओप्लास्टी' होत असते. म्हणजेच प्रत्येक कामोच्च आनंद (ऑरगॅझम) हा हृदय बळकट करणारा ठरत असतो. याचाच अर्थ ऑक्सिटोसीन ही हृदय-संजीवनी असून 'सेक्स' ही निसर्गाने दिलेली दीर्घायुष्याची गुरुकिल्लीच आहे. दाम्पत्याने म्हणूनच 'चाळिशीनंतर', 'साठीनंतरही' कामजीवनाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे अशा दाम्पत्यांनी स्वत:ला 'रिटायर' किंवा वृद्ध न समजता या वयातही कामजीवनाकडे लक्ष देऊन ते उपभोगण्याची क्षमता (सेक्शुअल फिटनेस) ठेवली पाहिजे. शिवाय सेक्सचे 'कपिलग' व्यवस्थित असले तर त्यांच्यातील नातेही घनिष्ठ व्हायला मदत होत असते. कारण मानवात सेक्स ही केवळ क्रिया नसून नातेसंबंध असतो.
हाडांची, अस्थिपेशींची (ऑश्चिओफाइट) व त्वचेच्या कोलॅजेनसारख्या आधार-घटकांची काळाप्रमाणे होणारी झीज काही प्रमाणात तरी ऑक्सिटोसीनने रोखली जात असते. त्यामुळे ऑक्सिटोसीनचा परिणाम हा 'अँटी-एजिंग', वयोवृद्धी-घट करणारा असतो. म्हणजेच शरीरात कालपरत्वे निर्माण होऊन शरीराचे वृद्धत्व वाढवणारे रासायनिक घटक, ऑक्सिडंट आटोक्यात आणण्यासाठी होत असतो. हृदयात गुलाबाच्या बागा फुलवणाऱ्या व समाधानी कामजीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्ती म्हणूनच 'ऑक्सिटोसीन'मुळे त्या वयोगटातील इतरांपेक्षा जास्त तरुण का दिसतात, याचे गमक आता लक्षात येईल.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेक्स हा सर्वोत्तम शारीरिक व्यायाम आहे. एका सेक्सच्या क्रियेमध्ये पुरुषाच्या साधारणपणे १०० ते १५० कॅलरीज नष्ट होऊ शकतात. (जिममध्ये ट्रेडमीलवर १५-२० मिनिटे चालण्याचा व्यायाम केल्यावर ७० ते ८० एवढय़ाच कॅलरीज जात असतात.) व्यक्ती किती जोमाने, अॅक्टिव्हपणे तो संबंध करीत असते त्यावर हे प्रमाण अवलंबून राहते. संबंधाच्या वेळी स्त्रीसुद्धा जर किती जोमाने, अॅक्टिव्हपणे सहभाग घेत असेल तर तिलाही तो उत्तम शारीरिक व्यायाम घडतो. हा व्यायाम कंबरेच्या स्नायूंना, सेक्सच्या पीसी स्नायूंना एवढेच नाही तर पुरुषाच्या प्रोस्टेट ग्रंथीलाही होत असतो. प्रोस्टेट ही सेक्सची ग्रंथी आहे हे लक्षात ठेवा. प्रोस्टेटची सुदृढता ही नियमित कामजीवनावर असते हे दाम्पत्याने लक्षात ठेवले पाहिजे.
स्त्रीमध्ये सेक्सच्या वेळी तिच्या ओव्हरीजवरही परिणाम होत असतो. म्हणून नियमित कामजीवनामुळे 'सिस्टिक ओव्हरीज' ही समस्याही आटोक्यात आणता येते. स्त्रीचे पाळीचे त्रासही कमी होत असतात. सेक्स हा पती-पत्नीतील नातेसंबंध असल्याने व्यायाम जेवढा नियमित नातेसंबंध तेवढाच सुदृढ!
सेक्स हा दाम्पत्य-संबंधाचा पाया असून त्यातील आनंद त्या संबंधाचा कळस का असतो हे सुज्ञांना सांगायची आता काय गरज?
Published: Saturday, February 2, 2013
Source - Loksatta.com
No comments:
Post a Comment