मनोगत: "चकवा !!
प्रेषक आशुतोश (शुक्र., १८/११/२०११ - १९:३१)
चकवा !!
Monday, November 21, 2011
चीनची घेराबंदी
Source - loksatta.com
सोमवार, २१ नोव्हेंबर २०११
युरोपातील मंदीचे आवर्तन अद्याप अपुरे असतानाच गेल्या आठवडय़ात जगातील सामरिक (स्ट्रॅटेजिक) घडामोडींचे केंद्र प्रशांत महासागराकडे वळले. पुढील दशकातील घडामोडींची नांदी या आठवडय़ात सुरू झाली असे म्हटले तरी चालेल. प्रशांत महासागरातील चीनचा दक्षिण भाग हा या घडामोडींचा केंद्रबिंदू आहे. ‘साऊथ चायना सी’ म्हणून हा भाग ओळखला जातो. या भागात तेल व नैसर्गिक वायूचे अमाप साठे आहेत. या समुद्रातील पार फिलिपाइन्सपर्यंतच्या किनाऱ्यापर्यंत आपली सीमा असल्याचा चीनने दावा केला आहे. भारतातील अरुणाचल व अन्य बराच प्रदेश जसा चीन स्वत:चा म्हणून दाखवितो तोच प्रकार सागरी हद्दीबाबत चीनने सुरू केला. व्हिएटनाम, फिलिपाइन्स, मलेशिया, इंडोनेशिया असे १८ छोटे-मोठे देश या पट्टय़ात आहेत. जगातील सर्वाधिक सागरी वाहतूक व सुमारे तीन ट्रिलियन डॉलर्सची उलाढाल दरवर्षी या टापूत होते. इंधनसाठे व व्यापार यामुळे या पट्टय़ात हातपाय पसरायला चीनने सुरुवात केली. आपली अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी नव्या नव्या बाजारपेठांच्या शोधात देश असतात. भारत असले उद्योग करीत नाही. आपले नेते आत्मसुखात मग्न असतात. पण चीन, अमेरिका यांचे तसे नाही. त्यांना भौतिक समृद्धी महत्त्वाची वाटते. ती टिकावी, वाढावी अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी साहसे करण्यास, नवे मार्ग शोधण्यास ते तयार असतात. आपल्या देशाचे हित साधून मग जगाच्या हिताकडे (जमल्यास) लक्ष देतात. अलिप्ततेची तत्त्वचर्चा करण्यापेक्षा रोकडा व्यवहार त्यांना पसंत असतो. जगात काय घडामोडी चालू आहेत याची फिकीर भारतातील नेत्यांना नसते. जगाच्या उलाढालीत भाग घ्यावा, काही फायदा करून घ्यावा अशी ईर्षां नसते. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा व्यासंग दूर राहिला, सर्वसाधारण अभ्यास करणारेही फारच थोडे आहेत. नेहरूंना ती जाण होती, पण ते स्वप्नरंजनात मश्गूल झाले. इंदिरा गांधी खूपच वास्तववादी होत्या. राजीव गांधींना या गोष्टीत रस होता व काही चांगले धोरणात्मक बदल त्यांनी केले. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी हे मातब्बर मुत्सद्दी होते. सुदैवाने मनमोहन सिंग यांना या विषयाची जाण आहे. अमेरिकेबरोबरचा अणुऊर्जा करार व अन्य काही चांगले निर्णय त्यांनी घेतले. सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेशी जुळवून घेणे हिताचे आहे असे त्यांचे मत आहे. याबाबत मतभेद होऊ शकतात. पण अन्य विषयात तटस्थ राहणारे मनमोहन सिंग येथे मात्र स्पष्ट भूमिका घेतात हे चांगले. आताही प्रशांत महासागरातील घडामोडींमध्ये भारत अमेरिकेच्या बाजूने झुकलेला दिसतो. अफगाणिस्तानपेक्षा पूर्वेकडे भारताने अधिक लक्ष द्यावे अशी अमेरिकेची इच्छा असून ओबामा यांनी ऑस्ट्रेलियातील भाषणात ती पुन्हा बोलून दाखविली. चीनचे वाढते सामथ्र्य अमेरिका व युरोप यांना धोकादायक वाटते. चीनचा विस्तारवाद ही नव्या शीतयुद्धाची सुरुवात ठरेल असेही काहीजण म्हणतात. आर्थिक मंदीवर उपाय म्हणून नवी बाजारपेठ शोधायला हवी. ती प्रशांत महासागराभोवतीच्या देशांमध्ये अमेरिकेला दिसते. येथील देशांच्या अर्थव्यवस्था वाढत आहेत. मध्यमवर्गाकडे पैसा आहे. जनरल इलेक्ट्रिकलसारख्या कंपन्यांना येथे व्यवसाय करायला मिळाला, तर अमेरिकेतील दीड लाख बडय़ा पगारदारांच्या नोक ऱ्या वाचतील. हा उद्देश ओबामांनी साध्य करून घेतला तो चीनचा धाक येथील देशांना घालून. चीनच्या विस्तारवादाचे आपण बळी पडू अशी भीती येथील देशांना वाटते. त्यांना पूर्ण संरक्षण देण्याचा वायदा ओबामांनी केला. व्यवस्थित आखणी करून या आठवडय़ात चीनची घेराबंदी करण्यात आली. याची सुरुवात हवाई बेटांवर झाली. तेथे ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप (टीपीपी)ची संकल्पना मांडण्यात आली. मुक्त व्यापारासाठी प्रशांत महासागराचा वापर ही यातील कल्पना असून नऊ देश त्यामध्ये सामील झाले. जपान, कॅनडा, मेक्सिको यांच्या सहभागामुळे या ‘टीपीपी’चे आर्थिक वजन एकदम वाढले. संपूर्ण उत्तर अमेरिका ही पूर्व प्रशांत महासागराच्या व्यापारात उतरली. आम्ही प्रशांत सागराचेच लोक आहोत, अशी घोषणा त्यापाठोपाठ ओबामा यांनी करून या सागरावर अप्रत्यक्ष हक्क सांगण्यास सुरुवात केली. चीनवर त्यांनी उघड शाब्दिक हल्ला चढविला. चीनने प्रगल्भ व्हावे असा सल्लाही दिला. हवाईपाठोपाठ ओबामा ऑस्ट्रेलियात गेले. इथे त्यांनी व्यापाराला लष्करी साहाय्याची जोड दिली. डार्विन बंदरामध्ये अमेरिकेचे सैन्य राहील असे त्यांनी जाहीर केले. येथून चीनचा दक्षिण समुद्र माऱ्याच्या टप्प्यात येतो. ओबामा तेथे असतानाच हिलरी क्लिंटन फिलिपाइन्समध्ये पोहोचल्या. फिलिपाइन्सबरोबर लष्करी करार करण्याबरोबरच अमेरिकी लढाऊ नौका तेथे राहतील असे जाहीर केले. चीनच्या दाव्यानुसार त्या देशाची सागरी सीमा फिलिपाइन्सपर्यंत पोहोचते. अमेरिका फिलिपाइन्समध्ये युद्धनौका का ठेवीत आहे याची कल्पना यावरून येईल. चीन अस्वस्थ होऊ लागला व बीजिंगच्या ‘पीपल्स डेली’मधून अमेरिकेवर तिखट प्रहार होऊ लागले. अमेरिकी चढाईचा तिसरा टप्पा बालीमध्ये सुरू झाला. तेथील परिषदेला १८ देशांचे प्रमुख हजर होते. भारत व चीनलाही आमंत्रण होते. ‘साऊथ चायना सी’मधील वाद मिटविण्यासाठी लहान देशांना मदत करण्यास आम्ही पुढाकार घेणार आहोत असे ओबामांनी येथे जाहीर केले. व्हिएटनाम, फिलिपाइन्स अशा देशांना हे हवेच होते. चीनच्या दबावाला टक्कर देण्यासाठी त्यांना बलवान मित्राची गरज होती. प्रशांत महासागरातील या टापूला ‘साऊथ चायना सी’ असे न म्हणता ‘फिलिपाइन्सचा सागर’असे म्हणण्यास हिलरी क्लिंटन यांनी सुरुवात केली. चीनला खिजविणारी ही भाषा जाणीवपूर्वक करण्यात आली. जपान, कोरिया, फिलिपाइन्स, इंडोनेशिया, दक्षिणेला ऑस्ट्रेलिया व अप्रत्यक्षपणे भारत अशी चीनची नाकेबंदी करण्यास अमेरिकेने सुरुवात केली आहे. चीनच्या समुद्रात केवळ व्यापारासाठी आम्ही तेल शोधत आहोत असे भारताने जाहीर केले. चीनचा त्याला आक्षेप आहे. भारताला या कळपात ओढण्यासाठी ऑस्ट्रेलियाने युरेनियम देण्यास तयारी दर्शविली. यामुळे आपला अणू कार्यक्रम मार्गी लागेल. गेली दोन वर्षे ऑस्ट्रेलिया आपल्या अणू कार्यक्रमाला विरोध करीत होती. आता अमेरिकेने सूचना देताच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान वेगळी भाषा बोलू लागल्या. हा दांभिकपणा असला तरी भारताला त्याचा फायदा आहे. मनमोहन सिंग यांनीही बालीमध्ये चीनशी खंबीर भाषेत बोलणी केली आणि अमेरिकेच्या कळपात गेलेलो नाही हेही सूचित केले. चीनला वेसण घालण्यासाठी आशियात भारताने अधिक सक्रिय व्हावे अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. त्यासाठी आपली तयारी सुरू आहे हे मनमोहन सिंग यांनी चीनला न दुखविता ध्वनित केले. भारत, ऑस्ट्रेलिया ते जपान असे मोठे अर्धवर्तुळ चीनच्या विरोधात उभे राहत आहे. अर्थात चीनही स्वस्थ बसलेला नाही. हे आव्हान स्वीकारत असल्याचे संकेत चीनने संयमित भाषेत दिले. लष्करी ताकदीपेक्षा आर्थिक ताकदीवर चीनचा भर असून प्रशांत महासागरातील लहान देशांना विविध प्रकल्पांसाठी अमाप मदत चीनने जाहीर केली. या देशांबरोबरचा चीनचा व्यापार अवघ्या २० वर्षांत ८ अब्ज डॉलर्सवरून ३५० अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे याची आठवण करून देण्यात आली. अमेरिकेबरोबरचा चीनचा व्यापार ४५० अब्ज डॉलर्सचा आहे. म्हणजे अमेरिकेला तुल्यबळ आर्थिक व्यवहार येथे होऊ शकतात हे चीनला दाखवून द्यायचे आहे. आर्थिक मंदीत सापडलेल्या व बुडत चाललेल्या देशांबरोबर जाणार की चीनसारख्या वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेबरोबर राहणार, असा खडा सवालही चीनने केला. अमेरिकेचे प्यादे म्हणून काम करणाऱ्यांना चीनच्या आर्थिक फायद्यात वाटा मिळणार नाही हे लक्षात ठेवा, असेही सांगण्यात आले. चीनने त्याचे चलन परिवर्तनीय करावे, व्यापारावरील र्निबध सैल करावेत आणि स्वामित्व हक्कांचे पालन करावे या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या आहेत. चीन ते करण्यास राजी नाही. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने गुंतून पडावे असे चीनला वाटते. म्हणून पाकिस्तानला तो छुपी मदत करतो. उलट अफगाणिस्तान व इराकमधून मुक्त होत असल्याने आता प्रशांत महासागराकडे अमेरिकेचे लष्कर लक्ष देईल, असे ओबामा उघड सांगतात. भारत यामध्ये सक्रिय होणे चीनला नको आहे. म्हणून बालीमध्ये चीनने अतिशय सौम्य शब्दात भारताबरोबर बोलणी केली. मागील शीतयुद्ध अमेरिका व रशियात झाले. भारताने तेव्हा रशियाची बाजू घेतली. त्याचे बरेवाईट परिणाम आपण भोगतो आहोत. अर्थात त्या वेळी आर्थिक ताकद मर्यादित असल्याने भारताला फारसे कुणी विचारीतही नव्हते. आता स्थिती तशी नाही. आपण महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आपले राजनैतिक डावपेच यशस्वी ठरले तर पुढच्या पिढय़ांचा बराच फायदा होऊ शकतो. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये परराष्ट्र धोरणाबाबत एकवाक्यता होणे गरजेचे आहे.

पन्नाशी : चीन-भारत युद्धाची!
Source - loksatta.com
रविवार २० नोव्हेंबर २०११ १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून आपला बराच मोठा भूप्रदेश गिळंकृत केला. त्यातून आपण काही धडा शिकलो का? आज या युद्धाला ५० वर्षे होत असताना चीन आणि भारत ही दोन राष्ट्रे जागतिक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आहेत. ६२ च्या युद्धानंतर चीनने थेट जरी आपली कुरापत काढली नसली तरी अरुणाचल प्रदेशावर अद्यापि चीन दावा करीत आहे. भारताचे वाढते सामथ्र्य हेही चीनसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच चीनकडून प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याला सर्वाधिक धोका संभवतो. २ च्या युद्धाचे वास्तव व त्याचे दूरगामी परिणाम, आजचा त्याचा संदर्भ आणि भविष्यात घ्यावयाची खबरदारी या साऱ्याचा ऊहापोह करणारा नि. लेफ्ट. जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांचा लेख.. २०नोव्हेंबर १९६२ ला चीन शासनाने अधिकृत घोषणा केली की, ‘‘Begining from... 00.00 on 21st Nov 1962 the chinese frontier guard will cease fire along entire Sino-Indian border." ." याचाच अर्थ या २१ नोव्हेंबर २०११ पासून चीन-भारत युद्धाला ५० वे वर्ष सुरू होईल! २० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनने लडाख क्षेत्रात लष्करी आक्रमणास सुरुवात केली. त्याही बऱ्याच आधीपासून चीनने आक्रमणाची तयारी आणि युद्धात्मक कार्यवाही सुरू केली होती. हे युद्ध जवळजवळ एक महिना चालले आणि अचानक २० नोव्हेंबरला चीनने एकतर्फी युद्धविरामाची घोषणा केली. स्वतंत्र भारताला चीनकडून हा पहिला सशस्त्र झटका होता. त्यानंतर भारतात तसेच जगभरात- विशेषत: पूर्व आशिया, मध्य आशिया, मध्यपूर्व आशियात अनेक मोठय़ा राजनैतिक, तसेच लष्करी घडामोडी घडल्या आणि त्याचे जागतिक परिणाम व दुष्परिणाम झाले. चीन-भारत युद्ध हे दुसऱ्या महायुद्धानंतर आशियातल्या दोन तरुण राष्ट्रांमध्ये झालेले पहिले युद्ध होते. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत ‘शीतयुद्धा’लाही सुरुवात झाली. हे शीतयुद्ध सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतरच संपले. २१ व्या शतकाच्या पहिल्या वर्षांपासूनच जगभरात एका नवीन दहशतवादी युद्धप्रणालीचा (जेहादी युद्ध) उगम झाला. अशा प्रकारची दहशतवादी युद्धे कमीत कमी आगामी ४० वर्षे तरी सुरूच राहतील यात शंका नाही. मी युद्धशास्त्राचा अभ्यासक आणि विश्लेषक आहे. ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रातले तज्ज्ञ भविष्यवाणी करतात त्याप्रमाणे मीही जगाच्या राजनैतिक, कूटनीतिक आणि रणनीतीच्या भविष्याबद्दल अभ्यास करतो. १९६२ मध्ये चीन आणि भारत यांच्यातले हे युद्ध का झाले, कसे झाले, याचा परामर्ष या युद्धास पन्नास वर्षे होत असताना घेणे निश्चितच अप्रस्तुत ठरणार नाही. त्याद्वारे भविष्यातील भारत-चीन संबंध आणि त्याचे जागतिक परिस्थितीवर होणारे परिणाम याबद्दल योग्य ती काळजी घेता येईल. १९५८ ते २००१ या कालावधीत मी ईशान्य भारतात जनरल ऑफिसर कमांडिंग ४ कोअर या पदावर ले. जनरलच्या रॅंकमध्ये काम केले. या कोअरची जबाबदारी संपूर्ण अरुणाचल प्रदेश (९८ हजार स्क्वे. कि. मी. भूप्रदेश- ज्याची मागणी आजही चीन करीत आहे.), भारत-ब्रह्मदेश सीमा, भारत-भूतान सीमा, आसाम व मेघालय इतकी विस्तृत होती. अरुणाचल प्रदेशात अंतर्गत सुरक्षेच्या जबाबदारीचे नेतृत्वही मी केले. या काळात अनेकदा माझी चीनच्या सैन्याधिकारी आणि कूटनीतिज्ञांबरोबर भेट आणि चर्चा झाली. या सर्व अनुभवांच्या आधारावर मी हा लेख लिहीत आहे. राजनैतिक व परराष्ट्र धोरणांनुसार कोणतीही व्यक्ती किंवा राष्ट्र आपल्या हिताकरिता राजनीतीचे माध्यम वापरतो. राजनीतीला साहाय्य करण्याकरिता कूटनीतीचा आधार घेतला जातो. परंतु जेव्हा राजनीती आणि कूटनीती दोन्हीही विफल होतात तेव्हा राजनैतिक लक्ष्यपूर्तीकरिता रणनीती हा शेवटचा पर्याय असतो. याकरिताच रणनीतीत पारंगत विशेषज्ञांना राजनैतिक व कूटनैतिक जाणीव व पारंगतता असणे फार महत्त्वाचे ठरते. हा युद्धशास्त्राचा सिद्धान्त आहे. १९६१ च्या नोव्हेंबपर्यंत दिल्लीमध्ये पाकिस्तानबद्दल जास्त काळजी व्यक्त केली जात होती. (ही वास्तविकता आजही कायम आहे.) चीनकडून मात्र युद्धात्मक कारवाई सतत नाकारली गेली. ( ही वास्तविकता आजही आहे. संरक्षण मंत्रालय वगळता अन्य मंत्रालये आणि अधिकारी समजतात, की चीन पुन्हा भारतावर आक्रमण करणार नाही!!) १० ऑक्टोबर १९५० रोजी तत्कालीन भारतीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्पष्टपणे लिखित स्वरूपात बजावले होते की, ‘चीनचे सैन्य आणि युद्धात्मक शक्ती तिबेटमध्ये वेगाने वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम भारतावर नक्कीच होणार. भारतीय नेतृत्वाने चीनवर विश्वास ठेवू नये.’ (या पत्राची प्रत माझ्यापाशी आहे.) परंतु त्यांच्या या धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि चीनच्या युद्धतयारीला प्रत्युत्तर देण्याकरिता भारताने काहीच प्रयत्न केले नाहीत. पुढे १२ वर्षांनी चीनने भारतावर आक्रमण केलेच. या युद्धात दुर्दैवाने भारताचा पराजय झाला. त्याचे परिणाम आजवर होत आले आहेत आणि भविष्यातही होत राहणार यात काहीच शंका नाही. भारतात ब्रिटिशांची सत्ता असताना ईशान्य भारताकडे कधीच लक्ष दिले गेले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५२ पर्यंत भारतीय शासनानेही त्याकडे दुर्लक्षच केलं. दुसऱ्या महायुद्धात बर्माकडून भारतावर जपानी आक्रमण झाल्यानंतरच ब्रिटिश शासनाला ईशान्य भारताची आठवण झाली. बर्मायुद्धातही आपल्याला फक्त आसाम, नागालँड आणि मणिपूर या भूभागाचे महत्त्व कळले. इतर भागांकडे १९५९ पर्यंत पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. या सर्व घडामोडींत चीन ही एक मोठी सत्ता आहे, याकडेही कुणाचे फारसे लक्ष गेले नाही. १९४० नंतर चीनचा प्रभाव व विस्तार मध्य आशिया आणि रशियाकडे वाढत होता. पण ब्रिटिश शासनाला त्याची काळजी नव्हती. कारण तेव्हा रशिया पाश्चात्य देशांचा प्रमुख शत्रू होता! दुसरे महायुद्ध संपल्यानंतरही शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेचा व युरोपचा प्रमुख शत्रू हा रशियाच होता; चीन नव्हे! ज्या चीनबद्दल आज अमेरिकेला आणि पाश्चात्य जगाला फार काळजी वाटत आहे, तोच चीन दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा मित्र होता. या वास्तवाची कल्पना आजच्या किती शासकीय अधिकाऱ्यांना आणि राजनीतिज्ञांना आहे? राजकारण, कूटनीती तसेच युद्धशास्त्राचा एक सिद्धान्त आहे की, जेव्हा दोन पक्षांत युद्ध किंवा प्रतिस्पर्धा होत असते त्या काळात एक तिसरा पक्ष तयार होतो आणि काही काळानंतर हा तिसरा पक्ष किंवा तिसरी शक्ती जास्त प्रबळ व महत्त्वपूर्ण होते. पाश्चात्य जगाचे रशियाबरोबर युद्ध आणि शीतयुद्ध सुरू असताना चीन एक महत्त्वपूर्ण व प्रबळ शक्तीच्या रूपात उभे राहिला आणि आज संपूर्ण जगाला त्याच्याबद्दल भीती वाटते आहे. सध्या चीनच्या ताब्यात असलेले सिकिआंग आणि तिब्बत क्षेत्र पूर्वनियोजित योजनेनुसार चीनच्या अधिपत्याखाली आले. चीनमध्ये सत्ता-परिवर्तनकरिता क्रांतिसंघर्ष सुरू असताना आणि त्यानंतर १९४९ मध्ये चीनच्या उत्तर-पश्चिम सिकिआंग भागात (जिथे आता चिनी शासनाविरुद्ध अंतर्गत संघर्ष सुरू आहे.) आणि १९५० मध्ये तिबेटला सैन्यबळाच्या आधारे चीनने गिळंकृत केले. मात्र, या सर्व घटनाक्रमाकडे भारताने तेव्हा पूर्णपणे दुर्लक्ष केले. १९१४ मध्ये ब्रिटिश शासनाने तिब्बतचे शासक व चीनबरोबर एक करार केला. त्याप्रमाणे दोन्ही देशांमध्ये सीमेच्या निर्धारणकरिता एक सीमारेषा (ज्याला मॅकमोहोन रेषा म्हणतात.) निर्धारित केली गेली. त्यावेळी चीनने त्याला विरोध केला नाही. परंतु ६० वर्षांनंतर चीनने घोषणा केली की, ही सीमारेषा चीनला मान्य नाही. आजही चीन तिला मान्यता देत नाही. नेफामधील युद्धाचे हे प्रमुख कारण होते. ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेशमध्ये या रेषेबद्दलच भारत व चीनमध्ये विवाद आहे. पूर्ण लडाखवर चीनने दावा सांगितला आहे. तिथेही चीनला निर्धारित सीमारेषा मान्य नाही. १९४७ पर्यंत ब्रिटिश शासन असताना भारत-तिब्बत सीमाक्षेत्राचा ३००० कि. मी. लांबीची सीमा अनिर्धारित होती. हा सीमावाद हेच १९६२ च्या युद्धाचे प्रमुख कारण झाले. १९५९ मध्ये चीनने अचानक मागणी केली की, संपूर्ण अरुणाचल प्रदेश (अगोदरचा ‘नेफा’ प्रदेश- ९८,००० स्क्वे. कि.मी. क्षेत्र) चीनचा आहे आणि भारताने त्यावर बेकायदेशीर अधिपत्य स्थापित केले आहे! चीनच्या या मागणीनंतरही तत्कालीन भारतीय शासनाचे डोळे उघडले नाहीत. १९५९ मध्ये त्यावरून कांगजू क्षेत्रात सैनिकी चकमकही झाली. आज हा प्रदेश चीनच्या ताब्यात आहे. कितीजणांना माहीत आहे की, १९५९ पर्यंत नेफा म्हणजे सध्याच्या अरुणाचल प्रदेशची संपूर्ण व्यवस्था (सुरक्षा व्यवस्थेसह) संरक्षण खात्याकडे नसून परराष्ट्र मंत्रालयाकडे होती! नेहमीप्रमाणे परराष्ट्र मंत्रालयाचे लक्ष पाश्चात्य जगत व अमेरिकेकडे जास्त होते. त्यामुळेच या क्षेत्राकडे पूर्ण दुर्लक्ष केलं गेलं. अरुणाचल प्रदेशमध्ये १९५९ पर्यंत भारतीय सैन्य नव्हतेच. आसामातही भारतीय सेना नव्हती. या संपूर्ण क्षेत्राची सुरक्षा व्यवस्था परराष्ट्र मंत्रालय आणि ‘आसाम रायफल’ (ज्याची व्यवस्था आता गृहमंत्रालयाकडे आहे.) कडे होती. १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच भारतीय सैन्य नोव्हेंबर १९५९ मध्ये आसाममध्ये पाठवलं गेलं. ही व्यवस्था लखनौस्थित सेना मुख्यालय पाहत असे. पूर्व कमांड- ज्याचे मुख्यालय आता कलकत्त्याला आहे, तेव्हा नव्हते. अंबालास्थित चार डिव्हिजनचे सैनिक आसाममध्ये पाठविले गेले. त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण, युद्धसामग्री, संचारसाधने दिली गेली नव्हती. पूर्व सैन्य कमांडचे मुख्यालय लखनौला होते. त्याचे प्रमुख ले. जनरल एस. पी. पी. थोरात होते. (थोरात घराणं मूळचं कोल्हापूरचं.) त्यांना भरपूर लष्करी अनुभव होता. त्यांचे युद्धकौशल्य व दूरगामी लष्करी दृष्टिकोन सर्वविदित होता. त्यांनी चीनची युद्धतयारी आणि त्याच्या धोरणाबद्दल भारतीय शासनाला अनेकदा सावध केले होते. परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. उलट, तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी त्यांची खिल्लीच उडविली. त्यात पंतप्रधानही सहभागी होते. ‘नेफामध्ये लष्करी व्यवस्था कशाला हवी? सैन्य कुणाविरुद्ध हवे? चीन आपला मित्र आहे. तो कधीच आक्रमण करणार नाही, याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे,’ असे उत्तर त्यांना देण्यात आले. संरक्षणमंत्र्यांनी तर असंही म्हटलं की, ‘चीनविरुद्ध आम्ही कूटनीतिक आघाडीवर युद्ध लढू.’ (we will fight a diplomatic war!! there is no possibility of war from china. We will fight on diplomatic front!!) दुर्दैवाने आजही तीच वृत्ती दिसते आहे. (We will fight pakistan and china on diplomatic front..) काही लोकांचा आक्षेप आहे की, कृष्ण मेनन यांचा चीनवर फार विश्वास होता आणि त्यांचे चीनबद्दलचे धोरण सहानुभूतीचे होते. कृष्ण मेनन यांच्या प्रभावाखाली येऊन तत्कालीन पंतप्रधानांनीही चीनच्या आक्रमक तयारीकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर दोनच वर्षांने चीनने भारतवर आक्रमण केलं आणि त्याचे दुरगामी परिणाम आपण आजपर्यंत भोगतो आहोत. आजही आपण चीनच्या वाढत्या लष्करी शक्तीकडे, महत्त्वाकांक्षा आणि सर्वागीण क्षमतावाढीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे दुष्परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील. उर्दूत एक शेर आहे.. ‘वक्त ऐसा भी देखा है तारीख की घडियों में; लम्हों ने खता की पर सदियों ने सजा पाई..’ याचा अर्थ असा की, क्षणिक केलेल्या चुकीचे परिणाम पिढी दर पिढीला भोगावे लागतात. १९४७ मध्ये काश्मीरमध्ये केलेल्या चुकीचे परिणाम आजही भारत भोगत आहे आणि भविष्यातही भोगावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे चीनच्या बाबतीतही १९५० ते १९६२ यादरम्यान केलेल्या चुकांचे आणि दुर्लक्षाचे परिणाम आपण आजही भोगतो आहोत. त्या चुका आपण आताही सुधारल्या नाहीत तर आपल्या येत्या पिढय़ांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आपले सध्याचे गृहमंत्री दक्ष, तज्ज्ञ व कुशाल अभ्यासक आहेत. ते नेहमी स्पष्टच बोलतात. त्यांनी सातत्याने म्हटले आहे की, भारताच्या अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेत आणि प्रशासनात ज्या कमतरता आहेत, त्याचे कारण लोकांमध्ये त्यासंबंधात आस्था कमी आहे. १९४७ ते १९६२ या काळात संरक्षण व्यवस्थेत झालेल्या संचयित दुर्लक्षामुळेच (accumulated neglect in defence preparedness) १९६२ च्या युद्धात भारतचा पराभव झाला. यावरून आपल्या लक्षात येईल की, युद्ध किंवा युद्धात्मक बाबी या अचानक उद्भवत नाहीत. त्याला इतिहास असतो. ऐतिहासिक कारणं असतात. पाश्र्वभूमी असते. त्यातून आगामी युद्धजन्य परिस्थितीबद्दल सूचनाही मिळतात. युद्धाच्या वादळांचा अभ्यास मान्सूनसारखा सतत करावा लागतो. त्यात जर चूक झाली वा दुर्लक्ष झालं तर कटु पराभव चाखण्याची पाळी येते. १९६५ च्या युद्धातही हेच झालं. कारगिल युद्धातसुद्धा आपण अशा पूर्वसूचनांकडे दुर्लक्ष केलं. १९६५ च्या आणि कारगिल युद्धातसुद्धा आपण पाकिस्तानला धडा शिकवला असला तरीही त्याची आपल्याला फार मोठी किंमत सैन्याधिकारी व सैनिकांच्या बलिदानाच्या रूपात द्यावी लागली, हे कटू वास्तव आहे. लडाख क्षेत्रात आणि नेफा प्रदेशात १९५९ पासूनच सैन्याच्या हालचाली आणि आक्रमक कारवाया चीनकडून सुरू होत्या. २० ऑक्टोबर १९६२ रोजी लडाख क्षेत्रात चीनने मोठय़ा प्रमाणावर आक्रमण केलं. चीनच्या सैन्याला सुरुवातीला सफलता मिळाली. चिपाचाप क्षेत्र, रिमकांगला, देमचोहु क्षेत्रात ते पुढे सरकले. परंतु भारतीय सैन्यानी त्यांना चुशूकच्या पुढे येऊ दिलं नाही. दौलत बेग ओल्डी (डी.बी.ओ.) क्षेत्रातही चिनी सैन्य घुसलं. त्याकाळी डी.बी.ओ.पर्यंत जाण्यासाठी आठ दिवस लागायचे. आजही पायवाटेने तिथे जाण्याकरता चार दिवस लागतात. लडाख क्षेत्रात भारतीय सैन्याचे फार मोठे नुकसान झाले. जेव्हा लडाखमध्ये हे युद्ध सुरू होतं तेव्हा भारतीय शासनाचे राजनैतिक आघाडीवरच युद्ध थोपविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तोवर चीनचे सैन्य त्यांनी १९५९ मध्ये दावा केलेल्या क्षेत्रापर्यंत पोहोचले. त्याच्या पुढे मात्र ते सरकले नाही. त्याचवेळी नेफा क्षेत्रातही युद्ध सुरू झाले. ३ ते १८ ऑक्टोबर १९६२ दरम्यान चिनी सैन्याने तवांग क्षेत्रात घागला, खिजेमाने, सोमदरांगचू, तवांग-बूमला क्षेत्रात आक्रमण केले. त्याचप्रमाणे पूर्व अरुणाचल प्रदेशमध्ये डीचू-किबिघू, वलांग क्षेत्रातही त्यांनी आक्रमण केले. २९ ऑक्टोबरला भारत सरकारने मान्य केलं की, चीनने भारतावर आक्रमण केलेलं आहे. बूमला, तवांग, जसवंतगढ आदी क्षेत्रांत भारतीय सैन्याने चिनी सैन्याचा सामना केला. त्यांचे स्मारक आजही तिथे आहे. नोव्हेंबरमध्ये बोमदिलापर्यंत (जे आता जिल्हा मुख्यालय आहे.) चीन सैन्य पोहोचले. वलांगवरही चीनने कब्जा केला. काही इतिहासकारांनी या युद्धासंदर्भात म्हटले आहे की, भारतीय सैन्याने तेव्हा काहीच केले नाही. हे चुकीचे आहे. मी स्वत: १९७८ मध्ये आणि त्यानंतर तिथल्या स्थानिक ग्रामवासीयांना भेटलो. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय सैन्याप्रमाणेच चीनचेही बरेच सैनिक या युद्धात मारले गेले. वलांग क्षेत्रात चिनी सैनिकांचे मृतदेह चीनपर्यंत नेण्यासाठी जवळजवळ आठ दिवस लागले. पुरेशी युद्धसामग्री नसतानाही भारतीय सैन्याने आपल्या युद्धकौशल्याचे प्रदर्शन केले. १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत चिनी लष्कर नेफा क्षेत्रात बोमदिला-तवांग-वलांगपर्यंत तसेच लडाखमध्ये चुशूक, देमचोग, डी.बी.ओ. पर्यंत पोहोचले. आणि २० नोव्हेंबर १९६२ रोजी बीजिंगमध्ये चीनचे तत्कालीन प्रधानमंत्री चाऊ एन लाई यांनी भारतीय राजदूतावासाचे चार्ज दी अफेअर यांना बोलावून चीन युद्धक्षेत्रात एकतर्फी युद्धविराम करीत असल्याचे त्यांना सांगितले. नोव्हेंबरमध्ये लडाख व नेफा क्षेत्रात बर्फ पडायला सुरुवात होते. तत्पूर्वी चिनी सैन्याला माघारी जाणे गरजेचे होते. कारण ते नंतर हिमवर्षांवात अडकले असते आणि त्यांचे परत जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले असते. जर चिनी सैन्य या क्षेत्रात थांबले असते तर त्यांना जिवंत राहण्याकरिता रसद पोचली नसती. या प्रदेशात हवाई मार्गाने रेशन आदी पोहोचवणं फारच कठीण होतं. याचाच अर्थ माघार घेऊन चिनी सैन्याने भारतावर मेहेरबानी केलेली नव्हती. त्यांना मागे जाणं आवश्यकच होतं. चीनकडे हवाई मार्गाने युद्धसामग्रीचा पुरवठा करण्याचे साधन त्यावेळी नव्हते. परंतु शत्रूच्या या कमतरेची जाणीव भारताला कुठे होती? युद्धकाळात शत्रूच्या शक्ती-सामर्थ्यांची व्याख्या आणि वर्णन करतो, परंतु शत्रूची कमतरता जाणणं व त्याचा फायदा घेणं हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. या युद्धात चीनचे ८०,००० च्या आसपास सैन्य सहभागी झालं होतं. तर भारतीय सैनिक अवघे १०,००० होते. या युद्धात भारताच्या ३१२८ सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले. १०४७ सौनिक जखमी झाले, तर ३१२३ युद्धकैदी झाले. चीनचे ७२२ सैनिक मारले गेले, १,६९७ जखमी झाले आणि दोन युद्धकैदी झाले. लडाख क्षेत्रात चीनच्या ताब्यात आजघडीला सुमारे ३८,००० वर्ग कि.मी. भारतीय प्रदेश आहे. पाकिस्तानने काश्मीर क्षेत्रातून जवळजवळ ५००० वर्ग कि. मी. भूभाग १९६३ मध्ये चीनच्या ताब्यात दिला आहे. हे क्षेत्र काश्मीरचा भाग आहे व ते भारताचे होते. आता अरुणाचल प्रदेशवर चीन दावा करत आहे. या क्षेत्रातला घागला, सोमद्रांगचू, असाफिला, लांगजू सोडून अन्य भूभाग भारताच्या ताब्यात आहे. त्याची सुरक्षा व संरक्षण व्यवस्था सध्या संरक्षण मंत्रालय पाहत आहे. या क्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी तेव्हाच्या केंद्र शासनाने हे युद्ध होण्याअगोदर परराष्ट्र मंत्रालयाकडून काढून घेतली होती. परंतु तोवर खूप उशीर झाला होता. १९६२ च्या चीन-भारत युद्धानंतर अनेकदा भारताने चीनबरोबरचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात जास्त यश मिळाले नाही. उलट, चीन १९६३ नंतर ईशान्य भारतात देशद्रोही आणि बंडखोर संघटनांना अनेक प्रकारचे साहाय्य करत आला आहे. त्यांना युद्धसामग्रीचा पुरवठाही चीन करतो आहे. त्याचवेळी भारताचा शत्रू म्हणून पाकिस्तानलाही मदत देत आहे. पाकिस्तानला अणुबॉम्ब तयार करण्यात चीनने साहाय्य केले आहे. १९७४ साली दोन्ही देशांनी परस्परांच्या देशात राजदूत नियुक्त केले. परराष्ट्रमंत्री असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी चीनयात्रा केली. १९८६ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांनीही चीनचा दौरा केला. त्यानंतर सीमावादावर तोडगा शोधण्याकरता भारत-चीनचे संयुक्त कार्यदल स्थापित केले गेले. मी या कार्यदलाचा सदस्य होतो. या कार्यदलाने दोन्ही देशांतले संबंध सुधारण्याकरता व सीमाक्षेत्रात शांती स्थापित करण्याकरता एक करारनामा तयार केला. ज्याला ‘शांति व मैत्री करार’ असे संबोधले गेले. पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वाकाली हा करार झाला. त्यानंतर या कराराचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्याकरता एका विशेष दलाची (Expert Group) स्थापना करण्यात आली. मी त्यातही सहभागी होतो. आजवर या कार्यदलाच्या १४ बैठका झाल्या आहेत. १५ वी बैठक याच महिन्यात भारतात होत आहे. चीनचे सीमेसंबंधीचे विवाद सर्वच शेजारी देशांबरोबर होते. अन्य देशांसमवेतचे विवाद संपुष्टात आले, परंतु ते चीनच्या अटींवरच! तेव्हा भारतानेही चीनच्या सगळ्या अटी मान्य करायच्या का? १९६२ च्या युद्धानंतर भारतीय संसदेत एकमताने ठराव संमत केला गेला आहे, की चीनने आक्रमण करून हडपलेला ३८,००० चौ. कि.मीटर भूप्रदेश भारत पुन्हा मिळवेल. परंतु हा प्रदेश सोडायला चीन राजी होणार नाही, हे निश्चित. कारण हा प्रदेश चीनकरता भू-राजकीयदृष्टय़ा दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. वर्तमान जागतिक परिप्रेक्ष्यात चीनच्या दृष्टिकोनात अनेक बदल झालेले आहेत. आजच्या घडीला भारत व चीन हे दोन्ही देश आशिया खंडात आर्थिक, औद्योगिक, यांत्रिक व सामाजिक महाशक्ती म्हणून पुढे येत आहेत. दोन्ही देश येत्या २५ वर्षांत कुठे पोहोचतील, याबद्दल संपूर्ण जगाला उत्सुकता आणि काळजी वाटत आहे. अमेरिका व पाश्चात्य देशांचा जागतिक प्रभाव कमी होत चालला आहे. सध्या जरी भारत आणि चीन या देशांत युद्ध होण्याची शक्यता कमी असली तरी भारताने आपल्या संरक्षणसज्जतेत कमतरता ठेवता नये. उलट, युद्धक्षमता, दक्षता व सजगता वाढविण्याचीच आवश्यकता आहे. चीन सध्या आपली सर्वागीण क्षमता वाढवत आहे. आज भारत आणि चीन एक-दुसऱ्याचे प्रतिस्पर्धी आहेत. आजचा प्रतिस्पर्धी उद्याचा शत्रू असू शकतो. चीन वेगळ्या पद्धतीने आज भारताची नाकेबंदी करतो आहे. तिबेट व हिमालय क्षेत्रात त्याची सामरिक तयारी मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. चीन यारलंग सांगपोचा (ब्रह्मपुत्रा नदी) प्रवाह चीनमध्ये वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचे परिणाम भारत व बांगलादेशवर होणार आहेत. ब्रह्मदेशमध्ये चीनची नौशक्ती वाढली आहे. बांगलादेश व श्रीलंकेतही सामुद्री शक्ती वाढविली जात आहे. पाकिस्तानमध्ये कराचीच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये ग्वादार बंदरविकासाचे काम सुरू आहे. त्याचा वापर चीनची नौसेना करणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वेमार्ग, भूमार्ग, पाइपलाइनचे बांधकामही चालले आहे. या सगळ्याचा फायदा व वापर युद्धकाळात होणारच. चीनचे नेपाळ व भूतानपर्यंत रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. राजस्थानमध्ये बाडमेर जिल्ह्य़ात भारतीय रेल्वेस्टेशन मुनाबाबच्या समोर पाकिस्तानचे घागरो हे मोठे स्टेशन तयार केले जात आहे. त्याचा फायदाही युद्धकाळात त्यांना होणार आहे. पाकिस्तान व ब्रह्मदेश पूर्णपणे चीनच्या कह्य़ात आहेत. ईशान्य भारतातील फुटीरवादी गट आणि नक्षलवादी संघटनांना चीन सर्व प्रकारचे प्रोत्साहन व मदत करीत आहे. दहशतवादाविरुद्धच्या युद्धासंबंधात पाकिस्तान आणि अमेरिकेत असलेल्या मतभेदांचा फायदा चीन घेत आहे. आपण हे विसरता कामा नये की, कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे सेनाप्रमुख व आय.एस.आय. प्रमुख चीनमध्येच होते! कारगिल युद्धाच्या वेळी चीनने अरुणाचल प्रदेशात कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी हे क्षेत्र माझ्या अधिपत्याखाली होते. चीनला यांगसे क्षेत्रात भारतीय सैन्याने सफलता मिळू दिली नाही. याचे सविस्तर वर्णन तत्कालीन भारतीय सेनाप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांनी त्यांच्या पुस्तकात ‘Surprise into Victoryमध्ये केला आहे. पाकव्याप्त काश्मीर हे क्षेत्र भारताचे आहे, हे चीनला मान्य नाही. भारतीय हद्दीतील काश्मीरबद्दलही चीन प्रश्नचिन्ह लावत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनची सामारिक क्षमता वाढत चालली आहे. चीनचे सैन्य या क्षेत्रात तैनात आहे. चीन हा भारत-अमेरिका संबंधांकडे संशयाच्या दृष्टीने पाहतो. भारत-अमेरिकेतील वाढते संबंध चीनला पसंत नाहीत. म्हणूनच तो पाकिस्तानची युद्धक्षमता वाढवीत आहे. अफगाणिस्तानवरही चीनची वक्रदृष्टी आहे. युद्धशास्त्र व चाणक्यनीतीचा सिद्धान्त आहे की, शास्त्रार्थ व शस्त्रार्थ बरोबरच्या लोकांत व बरोबरच्या राष्ट्रांतच होतात. यास्तव चीनची राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि आपला चीनसंबंधीचा १९६२ चा कटू अनुभव बिलकूल न विसरता भारताने एकात्मिक सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. चाणक्यनीतीचा आणखी एक सिद्धान्त आहे, की जर तुम्हाला युद्ध टाळायचं असेल तर युद्धाकरता सक्षम व सज्ज राहा. १९६२ च्या व कारगिल युद्धात हेच झालं. आपण युद्धाकरता तयार नव्हतो. भविष्यात ही चूक आपल्याकडून पुन्हा होता नये. शत्रूची शक्ती जोखत राहण्याऐवजी शत्रू किंवा प्रतिस्पध्र्याची कमतरता जाणून त्याचा लाभ उठवणं गरजेचं असतं. आपण ते करत नाही. आपले प्रतिस्पर्धी आणि शत्रू मात्र आपल्या कमतरतेचा अभ्यास करतात व त्याचा फायदा घेतात. चाणक्यनीती व युद्धशास्त्राचा मुख्य सिद्धांत म्हणजे- कऋ ८४ ‘If you know your adversary and if you can deter him, then you can live in peace for hundred years. . भारताकडे आपल्या प्रतिस्पध्र्यामध्ये काय कमतरता आहे, याचा अभ्यास करण्याची वृत्ती, धोरण व पद्धती आहे का? २१ व्या शतकात हे फार महत्त्वाचं व अत्यावश्यक आहे. |
Tuesday, September 13, 2011
आमची सुंदरी
आमची सुंदरी
सुनंदा देशमुख
Tuesday, September 13, 2011 AT 09:27 AM (IST)
Tags: muktpeeth
Source - http://72.78.249.107/esakal/20110913/5657985859218269250.htm
ती लहान बाळासारखी वडिलांच्या गळ्यात हात टाकून बिलगली. वडील तिला हळूहळू थोपटत राहिले. थोड्या वेळाने तिचे गळ्यातले हात काढायला लागले तर...
ही घटना खूप जुनी म्हणजे 1952-53 ची आहे. तेव्हा आम्ही इंदोरला राहत होतो. माझे वडील कंपनीत वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना प्राणी पाळायची फार हौस होती. एकदा तर इंदोरला सर्कशीतील वाघीण मेली. तिचा छावा वडिलांनी घरी आणला होता. आई त्याला बाटलीने दूध पाजायची. पुढे सर्कसवाले त्याला घेऊन गेले.
माझे वडील धारहून घरी येत होते, तेव्हा मोटारीच्या टपावर काहीतरी पडल्याचा आवाज आला. आमच्या ड्रायव्हरने पाहिले तर माकडाचे एक पिलू टपावर पडले होते. ते जिवंत होते. वडिलांनी मोटार कडेला उभी करायला सांगितली व ते ड्रायव्हरसह लांब जाऊन उभे राहिले. त्यांना वाटले की पिल्लाची आई त्याला घेऊन जाईल. तास, दोन तास थांबले; पण पण पिल्लाला न्यायला त्याची आई काही आली नाही. मग वडिलांनी पिल्लाला टॉवेलमध्ये ठेवले व घरी घेऊन आले.
माझी आई वैतागली, कारण माझा लहान भाऊ सहा महिन्यांचा होता. त्याला सांभाळायचे व पिल्लाचे पण करायचे. पिल्लू अगदी एक दोन दिवसांचे असावे. पण आईला वडिलांचे ते प्राणिप्रेम माहीत होते. मग काय, दुधाच्या दोन दोन बाटल्या, जुना रग, दुपटी वगैरे सर्व तयारी केली. आई आधी भावाचे करायची; मग पिल्लाचे करायची. भावाबरोबर तिचेही अंथरूण तयार करायची. (ती माकडीण होती) माणसांच्या बाळापेक्षा प्राणी लवकर मोठे होतात.
आईने तिचे नाव "सुंदरी' ठेवले. आईने भावाला मांडीवर घेऊन बाटलीने दूध पाजायला घेतले, की ही पण दुपट्यावर झोपून दोन्ही हातांनी बाटली धरून दूध प्यायची. आई माझ्या भावाला दोन- तीन तासांनी "शू' करायला चौकातल्या मोरीत धरायची. ही पण मोरीच्या कोपऱ्यात उभे राहून "शू' करायची. सुंदरीला बांधून ठेवत नसत. घरभर फिरायची. पण कधीही नुकसान केले नाही. एकदा तिने घरभर लेंड्या टाकल्या. आई चिडली. तिने सुंदरीचे बकोट धरले आणि मोरीपाशी नेऊन एक जोराची थप्पड मारली व ओरडली, ""कळत नाही "शी' कुठे करायची.'' त्यानंतर परत सुंदरीने घरात घाण केली नाही.
एकदा माझ्या भावाला बरे नव्हते. आई त्याला मांडीवर थोपटून निजवत होती. सुंदरीची लहर फिरली. तिने दुपटे अंथरले. तरा तरा जाऊन भावाला उचलले व दुपट्यावर ठेवले आणि पटकन आईच्या मांडीवर निजली. भाऊ जोरजोरात रडायला लागला. आईने चिडून तिला खाली ठेवले व दोन फटके मारले. झाले! सुंदरी तेव्हापासून कोठे गेली कळले नाही. संध्याकाळ व्हायला आली; पण सुंदरीचा पत्ता नाही. आईला तिचे व भावाचे करायची इतकी सवय झाली होती... लळा लागला होता. त्यामुळे आम्ही मुले, नोकर, आई, सर्व जण "सुंदरे' "सुंदरे' हाका मारत सुटलो; पण सुंदरीचा पत्ता नाही. आईचे डोळे वाहायला लागले. आईने कळवळून हाक मारली, ""सुंदरे कुठे आहेस तू? ये ना गं बाळ,'' आणि काय आश्चर्य दारावरच्या छतावर बसलेल्या सुंदरीने वरून आईच्या अंगावर झेप घेतली व आईच्या पदरावर डोके घासत राहिली. आई म्हणाली, ""सुंदरे मी तुला कधीही मारणार नाही.''
माझे वडील रिटायर झाले. मोठ्या बंगल्याचे चार ब्लॉक्स करून एक भाग आमच्याकडे ठेवला व तीन ब्लॉक्स भाड्याने दिले; पण सुंदरीमुळे लोक घाबरायला लागले तेव्हा तिला सरदार पळशीकरांच्या बागेत ठेवायचे ठरले. वडिलांनी एका मोठ्या बैठ्या झाडावर खाट बांधून, रग-दुपटी अंथरून जेवायचे ताट ठेवून सुंदरीला पहिल्यांदा साखळीने बांधले. सुंदरीलाही कळले होते. ती जणू रडत होती. वडील जड अंतःकरणाने घरी आले. कुणालाही करमत नव्हते. आई तर जेवलीच नाही. दोन- तीन दिवसांनी पळशीकरांचा माणूस वडिलांना बोलवायला आला. वडील गेले तर सुंदरी कशीबशी उठून उभी राहिली. वडिलांनी तिची साखळी काढली आणि ती लहान बाळासारखी वडिलांच्या गळ्यात हात टाकून बिलगली. वडील तिला हळूहळू थोपटत राहिले व थोड्या वेळाने तिचे गळ्यातले हात काढायला लागले तर... सुंदरी गेली होती.

Friday, August 19, 2011
न पेलणारा हलकेपणा!
न पेलणारा हलकेपणा!
loksatta.com
गिरीश कुबेर - रविवार १४ ऑगस्ट २०११
girish.kuber@expressindia.com
अमेरिकेच्या पत-मानांकनात घट झाल्यामुळे जगभरातील सगळ्याच देशांना या आर्थिक भूकंपाचे हादरे बसत आहेत. जागतिकीकरणाची ती अपरिहार्य परिणती आहे. मात्र, ही गंभीर परिस्थिती ओढवली आहे ती द्रष्टेपणाचा अभाव असलेल्या राजकीय नेतृत्वामुळे! अमेरिकेपासून ते अनेक युरोपीय देशांवर संभाव्य दिवाळखोरीचे संकट येऊ घातले आहे ते या देशांच्या कर्तृत्वहीन नेत्यांमुळेच. आपल्याकडे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या रूपाने एक अर्थतज्ज्ञ देशाची धुरा वाहतो आहे. परंतु त्यांना राजकीय इच्छाशक्तीची जोड नसल्याने ते हतप्रभ झाले आहेत. भारतातल्या सद्य:स्थितीप्रमाणेच जगही आज ‘निर्नायकी’ अवस्थेला पोहोचले आहे. त्यामुळे आज कधी नव्हे इतकी खंबीर जागतिक नेत्याची निकड भासते आहे.
उ द्या- १५ ऑगस्टला या घटनेला ८० वर्षे होतील. १९३१ सालच्या १५ ऑगस्टला माँटेग्यु कोलेट नॉर्मन यांनी एक पत्रक प्रसृत केलं आणि जगाला कळवलं की, ‘प्रकृती ठीक नसल्याने मी विo्रांतीसाठी परदेशात जात आहे. त्यामुळे माझे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत.’
आज माँटेग्यु नॉर्मन या नावाची महती अनेकांना कदाचित लक्षातही येणार नाही. पण नॉर्मन हे त्यावेळी जगातील एकमेव महासत्ता असलेल्या ब्रिटनच्या मध्यवर्ती बॅंकेचे- ‘बँक ऑफ इंग्लंड’चे गव्हर्नर होते. पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या आर्थिक मंदीतून जगाला बाहेर काढण्याची जबाबदारी त्यावेळी त्यांच्या एकटय़ाच्या खांद्यावर होती. त्याआधी काही वर्षे वास्तविक नॉर्मन आणि अमेरिकेच्या न्यूयॉर्क फेडरल रिझव्र्ह बँकेचे बेंजामिन स्ट्राँग, जर्मनीच्या रईश बँकेचे हाल्मर शाष्च्ट, बँक डि फ्रान्सचे एमिल मॉऱ्यु अशा जगातल्या महत्त्वाच्या बँकर्सचा एक गट तयार झाला होता. पण यातले स्ट्राँग १९२८ ला मरण पावले. दोन वर्षांनी कामाच्या वाढत्या दबावामुळे मॉऱ्यु यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि शाष्च्ट हिटलरला जाऊन मिळाले. तेव्हा जगाला मंदीच्या खाईतून बाहेर काढण्याची जबाबदारी येऊन पडली एकटय़ा नॉर्मन यांच्यावर. त्यांची त्यावेळची भूमिका इतकी महत्त्वाची होती, की ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने त्यांना ‘अदृश्य साम्राज्याचे अनभिषिक्त सम्राट’ अशी पदवी दिली होती. पण या सहस्रकातल्या पहिल्या मंदीत निर्माण झालेले आर्थिक ताणतणाव पेलणे त्या सम्राटालाही शक्य झाले नाही. १५ ऑगस्ट १९३१ या दिवशी सुटीचे निवेदन प्रसृत करण्याआधी तब्बल पंधरवडाभर नॉर्मन यांना रात्रीची झोप मिळाली नव्हती. आणि त्याचा त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावरही परिणाम झालेला होता. तो ताण इतका होता, की नॉर्मन मनातून मोडून पडले. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही आरोग्यासाठी त्यांना उपचार घ्यावे लागले. आणि त्यावेळी आलेल्या हताशेतून बाहेर पडण्यासाठीच त्यांना काही काळासाठी विo्रांतीची गरज निर्माण झाली होती.
आज ८० वर्षांनंतर जग पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. आणि आपले काम इतके गांभीर्याने घेणारे एकही नॉर्मन सध्या आपल्यात नाहीत. आज तर कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी परिस्थिती आहे. दळणवळणाची साधने प्राथमिक अवस्थेत होती त्यावेळी सहस्रकातील पहिली खरीखुरी मंदी टाळण्यासाठी जगातील सगळे बडे बँकर्स एकत्र आले होते. आज दळणवळणाने भौगोलिक सीमा पुसल्याचा डांगोरा पिटला जात असला तरीही महत्त्वाच्या बँकर्सची तोंडे वेगवेगळय़ा दिशेला आहेत. जे बँकर्सचे, तेच त्या बँकर्सचे नेतृत्व करणाऱ्यांचे. युरोपला आग लागलेली असताना जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मरकेल या आपल्या वार्षिक सुटीत कपात करायला तयार नाहीत. फ्रान्सचे निकोलस सारकोझी आपल्या दुसऱ्या पत्नीच्या पहिल्या अपत्याच्या डोहाळजेवणांत गुंतले आहेत. इटलीचे सिल्विओ बेरूलुस्कोनी आजची रात्र कोणत्या रंगीन बारबालांशी मज्जा करण्यात घालवावी, या विवंचनेत आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून हे ‘मरडॉक’दंशातून सावरले जायच्या आतच आपल्या देशातील दंगलीत पोळले गेले आहेत. जपानचे पंतप्रधान नाओटो कान हे सुनामीतून अजून उभे राहायचे आहेत. आणि जगातल्या आजच्या महासत्तेचे प्रमुख असलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे वर्षभर आधीच निवडणुकीच्या मानसिकततेत गेले आहेत.
त्यामुळे आताच्या संकटाची चर्चा भले कितीही मोठय़ा प्रमाणावर आर्थिक परिघातून होवो; पण या संकटाचे मूळ आहे ते राजकीय निर्नायकतेत! याचा सोपा अर्थ असा की, आज ‘जागतिक’ म्हणता येईल असे नेतृत्वच नाही. सर्व व्यवहारांच्या मुळाशी अर्थकारण असतेच असते, हे जरी सत्य असले तरी अर्थकारण चालवते जाते ते राजकारण्यांकडूनच! उत्तम राजकीय नेत्यास अर्थकारण कळते. पण शुद्ध अर्थकारण्यास आसपासच्या राजकारणाचे भान असतेच असे नाही. तेव्हा अर्थतज्ज्ञाकडे देशाची नाडी असली की अर्थव्यवस्था सुदृढ राहते, हा गैरसमज झाला. चांगल्या अर्थकारणासाठी देशाचे नेतृत्व अर्थतज्ज्ञाकडे असायला हवे असे नाही. अनेक महत्त्वाचे आर्थिक निर्णय राजकारण्यांनीच घेतले होते, हा इतिहास आहे. तेव्हा अर्थकारणास राजकीय ताकदीची जोड निर्णायक ठरते. तसे नसेल तर काय हाल होतात, त्याचा अनुभव आपण घेत आहोतच. तेव्हा आताच्या आर्थिक संकटाचा पाया आहे तो जगभरातील कमकुवत राजकीय नेतृत्वात!
आतापर्यंत जवळपास प्रत्येक अमेरिकी अध्यक्षाने कर्जमर्यादा वाढवून घेतलेली आहे. अगदी विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनीही. पण नेमक्या याच वेळी- म्हणजे खरी गरज होती त्याच वेळी- त्यांना तसे करता आले नाही. परिणामी बाजारात घबराट पसरली आणि त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेचे पत-मानांकन घसरले आणि जगभरातील शेअर बाजारांत रक्तपात झाला. आपल्यापुढचे संकट स्पष्टपणे दिसत असताना अध्यक्ष बराक ओबामा शेवटच्या क्षणापर्यंत शांत कसे राहिले? २ ऑगस्ट या दिवशी ओबामा सरकारची पतपुरवठावाढ करण्याची मुदत संपत होती, हे गेल्या पाच महिन्यांपासूनच त्यांना माहीत होते. तेव्हा या सरकारच्या राजकीय धुरिणांनी पतपुरवठा करणाऱ्यांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी अथवा त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी तोपर्यंत प्रयत्न का केले नाहीत? ही पतमर्यादा वाढवून मिळाली नाही तर ओबामा प्रशासनाला मोठय़ा राजकीय संकटाला तोंड द्यावे लागेल आणि त्याचा फटका त्यांना पुढच्या निवडणुकीत बसेल, असे मांडे विरोधीपक्षीय रिपब्लिकन मनातल्या मनात खात होते. म्हणजे या आर्थिक संकटाचे म३ळ डेमॉक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स यांच्यातील राजकीय हेवेदाव्यांत आहे, हे सप्ष्ट होते. अशावेळी राजकारणाच्या वहाणेने अर्थकारणाचा विंचू मारण्याचा रिपब्लिकन्सचा खेळ हाणून पाडणाऱ्या राजकीय चाली ओबामा खेळताना दिसले नाहीत. म्हणजेच एका अर्थाने ते कमी पडले ते राजकारणी म्हणूनच!
दुर्दैव हे की, जगातली क्रमांक एकची महासत्ता अशी काहीशी गडबडलेली असताना क्रमांक दोन ते पाच या टप्प्यातल्या उपमहासत्ताही तेवढय़ाच गोंधळलेल्या आहेत. अटलांटिकच्या एका बाजूला अमेरिका अवसायनात असताना अटलांटिकच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या युरोपची परिस्थिती तर आणखीनच वाईट आहे. एकेकाळी ही युरोपीय मंडळी अमेरिकेच्या डॉलरला पर्याय म्हणून युरो कसा तयार होईल, हे मिशीला तूप लावून सांगत होती. आता हा त्यांचा युरो जाऊच द्या, पण युरोपीय संघटना तरी एकत्र राहील की नाही, अशी चिन्हे आहेत. आजमितीला या युरोपीय संघटनेच्या कडबोळय़ातला सगळय़ात ताकदवान देश म्हणजे जर्मनी. त्या देशाच्या प्रमुख अँजेला मरकेल यांच्यावर त्यामुळेच ही संघटना एकत्र ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. पण मरकेलबाईच पुरेशा युरोपीय युनियनवादी नाहीत, अशी टीका त्यांच्यावर होते आहे. त्यामुळे सामान्य जर्मनांच्या मनात भावना आहे ती ही की, आपण कमवायचे आणि अन्य युरोपीय देशांनी गमवायचे. युरोपीय समुदायातील ग्रीस, आर्यलड, पोर्तुगाल, स्पेन आणि आता इटली हे देश जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आहेत. आणि या देशांच्या चुली पेटत्या ठेवण्यासाठी जर्मनीला इंधनपुरवठा करावा लागत आहे. घरात एकच कर्तृत्ववान कमावता असला की अन्य अशक्त भावांना जशी त्याला मदत करावी लागते, तसेच आता जर्मनीचे झाले आहे. आसपासच्या युरोपीय भाऊबंदांच्या हातापायाच्या काडय़ा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना चार घास मिळावेत यासाठी जर्मनीला आपल्या ताटातला घास काढून द्यावा लागत आहे. हा भार आपण किती काळ सोसायचा, असा जर्मन कुटुंबीयांचा प्रश्न आहे. आणि तो रास्तच आहे. पण हा दोष आहे तो युरोपीय कुटुंबव्यवस्थेतला. यामागचे महत्त्वाचे कारण असे की, युरोपीय संघटना म्हणून एकत्र येताना या देशांनी एक केले ते फक्त चलन. मात्र, अर्थव्यवस्थांचे खऱ्या अर्थाने एकत्रीकरण झालेच नाही. कोणत्याही सार्वभौम देशाला त्याच्या देशात तुट निर्माण झाल्यास एक हमखास उपाय हाताशी असतो. तो म्हणजे चलनी नोटा छापायचा. हा पर्याय चुकीचा वा चलनवाढीला जन्म देणारा असेलही; पण तो सार्वभौम देशाच्या हाती असतो. युरोपीय संघटनेतील देशांना नेमके तेच करता येत नाही. म्हणजे समजा- ग्रीसने ठरवले की आपली कर्र्जे कमी करण्यासाठी आपल्या नोटा छापायच्या, किंवा आपल्या चलनाचे अवमूल्यन करायचे, तर ते त्याला करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार आहे युरोपीय बँकेला. आणि पुन्हा या युरोपीय बँकेवर नियंत्रण आहे ते युरोपातल्या बडय़ा देशांचे. जागतिक बँकेला सगळय़ात जास्त रसद अमेरिकेची जाते. त्यामुळे या बँकेवर अप्रत्यक्षपणे नियंत्रण असते ते अमेरिकेचेच. या बँकेचे नाव भले जागतिक बँक असेल, पण आतापर्यंतचे या बँकेचे सगळे प्रमुख हे अमेरिकीच होते. तसेच युरोपीय बँकेचेही. त्यामुळेच ग्रीस आदी देशांमध्ये युरोपीय संघटनेत राहायचे की नाही, या मूलभूत विषयावरच चर्चा सुरू झालेली आहे. या चर्चेने जोर धरला, ती पसरली आणि युरोपीय संघटना खरोखरच दुभंगण्याचा प्रसंग आला तर ते अमेरिकेइतकेच, किंबहुना अधिकच गंभीर असे नवे मोठे आर्थिक अराजक ठरेल. परंतु याची जाणीव युरोपीय नेतृत्वाला नाही. किंवा असल्यास, त्यांचे वर्तन तरी तसे दाखवत नाही. त्यामुळेच मरकेलबाई अडेलतट्टूपणे वागताना दिसतात आणि आपली- म्हणजे जर्मनीची जबाबदारी झटकून टाकतात. युरोपीय संघटनेला आग लागलेली असताना मरकेलबाई आपल्या वार्षिक सुटीत आराम करण्यात मग्न होत्या. या काळात त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाशी कसलाही संपर्क ठेवला नाही आणि युरोपचे काय होणार, याची कसलीही फिकीर केली नाही. मरकेलबाई सुटीवर, अमेरिका गडगडलेली. हा गोंधळ कमी म्हणून की काय, स्वित्र्झलडने आपल्या फ्रँक या चलनाच्या किमतीत अचानक मोठी कपात केली. त्याचा फटका अनेक देशांना बसला. त्यामुळेही नाराजी निर्माण झाली. वनराज सिंह नाहीसा झाल्यावर अन्य छोटे-मोठे प्राणी डरकाळय़ा फोडू लागतात, तसे चलनबाजारात झाले आहे. डॉलरची आयाळ झडल्यामुळे जपान, चीन या पारंपरिक स्पर्धकांत चलनयुद्ध उफाळून येईल अशी चिन्हे आहेत.
‘फायनान्शियल टाइम्स’ने गेल्या आठवडय़ात आर्थिक गोंधळाच्या परिस्थितीवर भाष्य करताना आपल्या अग़्रलेखाला मथळा दिला होता- ‘द अनबेरेबल लाईटनेस ऑफ लीडर्स.’ ‘जागतिक नेतृत्वाचा हा न पेलणारा हलकेपणा’ सध्या तुमच्या आणि आमच्या अर्थव्यवस्थेची गती पार बिघडवून टाकणार आहे, हे नक्की. वास्तविक हा ‘हलकेपणा’ आताचा नाही. त्याला सुरुवात झाली रोनाल्ड रेगन यांच्यापासून. त्याला अधिक गती दिली धाकटय़ा जॉर्ज बुशसाहेबांनी. रेगन यांनी कर वाढवले, पण त्यापेक्षा अधिक लोकप्रिय योजनांवर खर्च केला. बुश त्याहून थोर. त्यांनी कर वाढवले तर नाहीतच, पण नवनवी युद्धे लादली आणि वर करसवलतींच्या लोकप्रिय योजनांचा सपाटा लावला. त्यामुळे अमेरिकेची तिजोरी सातत्याने रिकामीच होत राहिली. बिल क्लिंटन यांच्या कारकीर्दीतला १९९८ ते २००० हा टप्पा सोडला तर अमेरिकेचे उत्पन्न आणि खर्च यांत कायमच तफावत राहिलेली आहे. म्हणजे सामान्य अमेरिकी माणसाचे उत्पन्न समजा- शंभर रुपये असेल, तर त्याचा खर्च सव्वाशे रुपये असतो. अशा वेळी वरच्या पंचवीस रुपयांचे काय होते? तर ते आपण देत असतो. कारण जगाचे चलन आहे ते अमेरिकेचे डॉलर. त्यामुळे ज्या देशाकडे वरकड शिल्लक असते तो देश वरच्या पैशांतून डॉलर विकत घेतात आणि अमेरिकी बँकांत ठेवतात.
त्यामुळे आता पुढचा संघर्ष असणार आहे तो डॉलरला या सिंहासनावरून हटविण्यासाठी. चीनने आताच त्यासाठी आपली आर्थिक हत्यारे परजायला सुरुवात केली आहे. आणि रशिया, इराण आदी देश चीनच्या बाजूने उभे राहायची तयारी करू लागलेत.
इतक्या तापलेल्या वातावरणात नेतृत्वाचा हा हलकेपणा खरोखरच आपल्याला पेलणारा नाही.

Tuesday, June 14, 2011
नसे गर्भारपण, तरि फुटला पान्हा...
नसे गर्भारपण, तरि फुटला पान्हा...
मंजिरी फडणीस (manjiri.phadnis@esakal.com)
Tuesday, June 14, 2011 AT 04:52 PM (IST)
Source - esakal
Url - http://www.esakal.com/esakal/20110614/5083983653632248186.htm
दत्तक घ्यायचं ठरलं, पण त्या बाळाचं आईपण सर्वार्थाने निभावून नेण्यासाठी आपलं दूधही त्या बाळाला मिळायला हवं, ही एका आईची अपेक्षा पूर्ण केली आणि प्रसूतीविना पान्हा फुटण्याची अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली नाशिकच्या डॉ. श्यामा कुलकर्णी यांनी... त्यांच्या या आणि इतर विविध समाजोपयोगी कार्यांबद्दल ...
संध्याकाळची वेळ...गोठ्यात हंबरणारी गाय...गाईचा मालक बांधलेल्या वासराला सोडतो आणि वासरू सुसाट आईकडे धाव घेतं. तिच्या आचळाला बिलगतं. तिला लुचू लागतं...वासरू ढुसण्या देत असतं तरीही गाय त्याला चाटत राहते... प्राणी असो नाही तर माणूस, आईच्या दुधातून आपल्या शरीरात झिरपत जाणारं सर्वव्यापी ममत्व सारखंच असतं. मुलाला दूध पाजणं यात त्या माउलीला जन्माच्या सार्थकतेचाच आनंद वाटतो. आई म्हणून आपण दूध पाजू शकलो नाही तर आईपणात कमतरता राहिल्याची बोच सलत राहते.
नाशिकमधल्या एका बाईंना अशीच आईपणातल्या कमतरतेची बोच जाणवत होती. त्यांना मूल दत्तक घ्यायचं होतं. आपण त्या मुलाला आणलं की ते स्वत:च्या आईचं दूध पिऊ शकणार नाही. शिवाय मला दूध नाही म्हणजे ते तान्हुलं आईच्या दुधाला मुकेल, या विचारानं तर त्यांना रडूच यायला लागलं. त्या बाईंनी डॉक्टरांना आपल्या मनातली ही बोच सांगितली. प्रयत्न सुरू झाले...
बाळ जन्माला आलं आणि या आईच्या मांडीवर आलं...या दत्तक मुलाला त्यांनी छातीशी धरलं आणि "नसे गर्भारपण, तरि फुटला पान्हा ...'चा चमत्कार झाला.
त्यातल्या आईपणाच्या भावनेला वैज्ञानिक आधार दिला. मूल जन्माला न घालता "हे आईपण" दिलं नाशिकच्या डॉ. श्यामा कुलकर्णी यांनी. ""अनेकदा मूल जन्माला घातल्यानंतरही आईला पान्हा फुटत नाही, कधी दूध कमी असतं. आई स्वत:त काही कमतरता असल्याचं मानून खचून जाते आणि साहजिकच मुलाच्या वाढीवरही सुरुवातीपासूनच परिणाम व्हायला लागतो. हे सगळं टाळता येतं.'' डॉ. श्यामा आत्मविश्वासानं सांगतात. बालरोगतज्ज्ञ असूनही डॉ. श्यामा यांचा विशेष अभ्यास आहे तो स्तनपानाबद्दल. ब्रेस्ट फीडिंग कौन्सेलिंगच्या राष्ट्रीय पातळीवरच्या प्रशिक्षक म्हणून त्या काम करतात.
डॉ. श्यामा यांच्याशी बोलत असतानाच एक "आई" तिथे आली. तिला पुरेसं दूध येत नव्हतं. डॉ. श्यामा म्हणाल्या, ""अशा अनेकजणींच्या समस्या असतात. कधी प्रसूतीनंतर दूधच येत नाही, कधी ते पुरेसं नसतं. कधी स्तनाग्राला चिरा पडतात, त्यामुळे बाळाला दूध पाजता येत नाही. आजकाल तर अनेकजणी सुरुवातीलाच बाटलीच्या दुधाची सवय मुलाला लावतात. यात कधी फॅशनचा भाग असतो, आपला फिटनेस बिघडेल अशी गैरसमजूत असते. काही दिवसांनी त्यांना आपली चूक कळते तेव्हा पान्हा आटलेला असतो. अशा अनेकींवर मी उपचार केले आहेत.''
मागच्याच वर्षी आलेली ती केस म्हणजे डॉ. श्यामा यांच्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. अजूनही तो अनुभव तसाच त्यांच्या डोळ्यासमोर येतो. ""एक बाई आली ती अतिशय अस्वस्थतेतच. तिला काय समस्या आहे हे सांगतानाही रडू येत होतं. तिला आधीच्या दोन मुली आहेत. तिच्या जावेलाही दोन मुली. आता जाऊ पुन्हा गरोदर होती. तिला जुळं होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्यातलं एक मूल हिनं दत्तक घ्यायचं होतं. त्या मुलाला आई म्हणून आपण जवळ करू शकू का, याचा ताण तिच्यावर होता. त्यांनी तिला धीर दिला. आईपासून आपण मूल तोडतो आहोत, असं वाटून घेऊ नकोस, हे तिला समजावलं. डॉ. श्यामा यांनी तिला सर्वांत मोठा धीर दिला तो तू या मुलाला पाजू शकशील याचा. त्या दृष्टीनं उपचार सुरू झाले.
डॉ. श्यामा म्हणाल्या, ""तिला सुरुवातीला समुपदेशन केलं. तिच्या संपूर्ण परिवारालाही समुपदेशन केलं. त्यानंतर तिला मसाजाच्या पद्धती शिकवल्या. मेडिटेशन सुरू केलं. याबरोबरीने तिला काही आयुर्वेदिक औषधं दिली. हॉर्मोन्स देणं मी सुरुवातीपासून टाळलं, कारण त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. महिने उलटले तसे हिच्यात बदल जाणवू लागले. हिचंही वजन काही प्रमाणात वाढलं. जाऊ प्रसूत झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बाळाला हिच्याजवळ दिलं.''
""कोणत्याही आईने मूल जन्माला आल्यानंतर त्याला स्पर्श करणं, छातीशी धरणं गरजेचं असतं,'' डॉ. श्यामा मुद्दाम विषयांतर करत सांगू लागल्या. त्या म्हणाल्या, ""या काळात आई आणि मुलात इमोशनल बॉंडिंग तयार होत असतं. म्हणून आईने त्याला अधिकाधिक स्पर्श करावा. तसंच बाळाच्या स्पर्शानंही मातृत्वाची भावना अधिक उद्दीपित होते आणि दूध यायला मदत होते. ही थेरपी त्या स्त्रीच्या बाबतही सुरू ठेवली. मग तिला पाजायला घ्यायला सांगितलं. पाच दिवसांनी त्या मातेला पान्हा फुटल्याचं लक्षात आलं. त्या दिवशी अगदी सकाळीच मला तिचा फोन आला, डॉक्टर मला दूध येतंय. तिचा आनंद ओसंडत होता. आम्ही ते दूध औरंगाबादला फार्मसी कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठवलं. त्या बाळाच्या जन्मदात्रीचं दूधही पाठवलं. दोन्ही दुधांतले घटक बहुतांशी सारखेच होते. आता ते बाळ 9 महिन्यांचं झालं आहे. त्याची वाढ व्यवस्थित आहे.'' हे सांगताना त्या आईचाच आनंद डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही जाणवला.
डॉक्टर या केसबद्दल सांगतानाच एक पालक डॉक्टरांची वेळ घेण्यासाठी आले. "बालरोगतज्ज्ञ, स्तनपानाचा अभ्यास आणि वयात येणाऱ्या मुलांसाठी उपचार" अशा विविध विषयांवर त्या मार्गदर्शन करतात. त्यांना मुलासाठी डॉक्टरांची वेळ घ्यायची होती.
या पालकत्व मार्गदर्शनाचेही त्यांच्याकडे खूप अनुभव आहेत. त्यांनी एक केस सांगितली. ""एक आई-वडील आठ-नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. तो मुलगा घरात चोऱ्या करत होता. त्यानंतर तो मुलगा फारसा बोलतही नव्हता. मी हळुवार पणे त्या मुलाशी बोलले. एक-दोन भेटींतून त्याचा माझ्यावर विश्वास वाढला. तो म्हणाला, ""आई आजारी असते. वडील त्यांच्या कामात असतात. मग घरातली अनेक कामं मला करावी लागतात. तीच कामं नोकरांनी केली असती तर त्यांना पैसे दिले असतेच ना, म्हणून मी घेतो ते पैसे.'' त्या पैशांचं काय करतोस, असं विचारल्यावर तो लगेच काही बोलला नाही. पुढच्या वेळी येताना त्याने एक छोटं खोकं आणलं होतं. त्यात नोटा बोळे करून टाकलेल्या होत्या. तो मुलगा त्या नोटांचं करत काहीच नव्हता...
दुसरा एक मुलगा खूपच गप्प झाला होता. कोणाशीच न बोलता तो सतत झोपून राहायचा. त्याच्याशी बोलल्यानंतर समजलं की त्याचा आवाज फुटला होता. एक-दोनदा बाहेरून आलेले फोन त्याने घेतले आणि फोनवरची व्यक्ती त्याची आई समजून त्याच्याशी बोलू लागली. परिणामी, आपला आवाज बायकी झाला आहे अशी भावना मुलाच्या मनात आली आणि तो बोलायचाच बंद झाला...''
असे किती तरी प्रश्न. कधी मुलांमध्ये व्यसनाधीनतेचा प्रश्न असतो, कधी अति जंक फूडमुळे होणाऱ्या परिणामांचा प्रश्न असतो. कधी वयात येणारी मुलं मोबाइल ऍडिक्ट होतात. अशा अनेक समस्या डॉ. श्यामा यांच्यापर्यंत येतात आणि त्या त्या सोडवतात. चुकीच्या पालकत्वामुळेच असे प्रश्न निर्माण होतात, असं त्या ठामपणे सांगतात. या संदर्भात मार्गदर्शनपर कार्यशाळाही त्या घेतात.
डॉ. श्यामा यांच्या क्लिनिकमध्ये एक वर्कशॉप सुरू होतं. मुलं जमली होती. तिथे वेगवेगळ्या वस्तू आणल्या होत्या. त्या म्हणाल्या, ""प्रत्येक गुरुवारी मी इथे पालकत्वाबाबतचे वर्गही घेते. तसेच मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठीही आमच्याकडे काही प्रयोग होतात. आता मुलांना त्यांच्या आवडीच्या वस्तू जमा करायला सांगितल्या. कोणाच्या अधिकाधिक वस्तू होतात अशी स्पर्धाच ठेवली. कोणी खोडरबर गोळा केलं, कोणी पुस्तक. यात वस्तू कोणती यापेक्षा त्यांनी आपल्या छंदाला वेळ देणं महत्त्वाच असतं. विविध प्रयोगांतून मुलांचा भावनिक बुद्ध्यंकही आम्ही तपासत असतो.''
डॉ. श्यामा यांच्या हॉस्पिटलमध्ये हस्ताक्षर सुधारणा वर्गही आहेत. ""हे वर्ग थोड्या वेगळ्या मुलांसाठी आहेत.''त्या पटकन म्हणाल्या, ""डिस्लेक्सिया थेरपिस्ट म्हणून मी काम करते.'' म्हणजे "तारे जमीं पे'मध्ये मुलगा आहे ना तसंच...त्यांनी अधिक स्पष्टता आणली. मूल जन्माला आल्यानंतर त्याला गरज असते आईच्या दुधाची. त्याला इतर काही समस्या असतील तर गरज आहे उपचारांची आणि वयात येताना त्याला गरज आहे मार्गदर्शन आणि भावनिक आधाराची...या सगळ्या गरजा पूर्ण होतात डॉ. श्यामा यांच्या "जगदीशा चाइल्ड गायडन्स क्लिनिक ऍण्ड रिसर्च सेंटर'मध्ये.
थोडक्यात, हे आहे एक परिपूर्ण व्यक्ती घडवणारं केंद्र, ऑल इन वन!

Subscribe to:
Posts (Atom)