जीवघेणी लाडीगोडी
loksatta.com, डॉ. अनिल भोरास्कर - रविवार, २६ सप्टेंबर २०१०
मोठी आकडेवारी सांगून घाबरवायचे नाही म्हटले तरी भारतात हृदयविकाराचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे, हे वास्तव लक्षात घेतलेच पाहिजे. सुमारे २०० कारणांमुळे हृदयविकार होऊ शकतो. या सर्वच कारणांची चिकित्सा एका पुरवणीमध्ये करणे शक्य नाही. परंतु हृदयविकाराचा धोका कसा टाळता येईल आणि तो झाल्यावर काय काळजी घ्यायला हवी, याचा ऊहापोह करणारे हे काही लेख, आजच्या जागतिक हृदयदिनानिमित्त..भारतात अमेरिकेच्या चौपट, तर जपानच्या वीसपट हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते. अनेकांना लहान वयातच हृदयाचे विकार सुरू होतात आणि त्याची तीव्रताही भारतात इतर देशांच्या मानाने अधिक आढळते. हृदयविकार, विशेषत: हृदयरोहिणीविकार (Coronary Artery Disease) कुठल्या कारणांमुळे होतो, हे वैद्यकीय शास्त्राला माहीत असले तरी जवळजवळ २०० कारणांपैकी प्रत्येक रुग्णाला नेमके कुठले कारण हृदयविकाराला आमंत्रण देते, याविषयी मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. या कारणांना Risk Factors असे संबोधतात. यातील काही रिस्क फॅक्टर अनेकदा एकत्र आलेले आढळून येतात. उदा. मधुमेह, उच्चरक्तदाब, स्थूलपणा, सुटलेले पोट, व म्लेदाम्ले विकृती. या सर्व कारणांना एकत्रितपणे ‘मेटॅबॉलिक सिन्ड्रोम’ असे संबोधतात. या ‘मेटॅबॉलिक सिन्ड्रोम’चे प्रमाण समाजात अधिक प्रमाणात आहे. मधुमेहाचे निदान होण्याअगोदर हा ‘मेटॅबॉलिक सिन्ड्रोम’ होत असतो.महिलांना पुरुषांच्या मानाने हृदयविकार कमी प्रमाणात होतात; मात्र ज्यांना मधुमेह असतो, अशा महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिकआढळून येते. मधुमेहामुळे होणाऱ्या व्याधींमध्ये सर्वात अधिक प्रमाणात आढळून येणारी व्याधी म्हणजे हृदयविकार. जवळजवळ ६५ टक्के मधुमेही व्यक्ती हृदयविकारामुळे मृत्यू पावतात. भारतात २०२५ सालापर्यंत ५.७ कोटी लोकांना मधुमेह होईल आणि त्यातील २० लाख व्यक्ती हृदयविकाराला बळी पडतील, अशी भीती WHO ने व्यक्त केली आहे. ती अनाठायी नसावी, असे वाटते.मधुमेहास Coronary Artery disease Equivalant म्हणतात. म्हणजे, ज्या व्यक्तीला एकदा हृदयरोहिणीविकार होऊन गेला असेल, त्याला तो विकार परत होण्याची जी शक्यता असते, तितकीच शक्यता केवळ मधुमेह आहे म्हणून हृदयरोहिणी विकार होण्याची असते. अनेकवेळा इन्श्युरन्स कंपन्या मधुमेही व्यक्तींना हृदयविकारासाठी केलेल्या उपचारांचा खर्च Pre-existing Disease म्हणून विमा पॉलिसी देण्याची टाळाटाळ करतात, असा अनेकांचा अनुभव आहे. मधुमेही व्यक्तींना इतरांपेक्षा अधिक तीव्र स्वरुपाचा हृदयविकार होऊ शकतो आणि त्याची सर्वप्रथम दिसणारी लक्षणेसुद्धा वेगळ्या स्वरूपाची असतात.हृदयविकाराची सर्वमान्य सर्वपरिचित लक्षणे म्हणजे छातीत दुखणे किंवा कळा येणे. ती कळ छातीपासून मानेपर्यंत व डाव्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत जाते, घाम फुटतो, अस्वस्थ वाटते, वगैरे. परंतु ज्या व्यक्तींना बरेच दिवस मधुमेह असतो, त्यांना मज्जातंतूंच्या बधिरपणामुळे वरील लक्षणे जाणवत नाहीत. छाती न दुखल्यामुळे मधुमेही रुग्ण गाफील राहतात आणि लगेच वैद्यकीय मदत घेत नाही. त्यामुळे नकळत हृदयरोहिणी विकार होऊन, हृदयाच्या स्नायूंवर ताण पडून, पंप नाकाम होतो. आपले हृदय शरीराच्या विविध भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या पंपाचे काम करत असते. त्याची कार्यक्षमता एका मिनिटाला पाच लीटर रक्त शरीराच्या महत्त्वाच्या इंद्रियांना पुरवण्यास समर्थ असते. ती कार्यक्षमता ४० टक्क्यांनी कमी होऊन दम लागणे, थकवा येणे, भोवळ येणे, डोळ्यापुढे अंधार येणे, हातापायातील ताकद कमी होणे वगैरे लक्षणे दिसू लागतात. मात्र ही लक्षणेसुद्धा ज्या व्यक्ती फक्त बैठया स्वरूपाची कामे करतात, चालण्याऐवजी गाडी वापरतात, जिने चढण्याऐवजी लिफ्टचा उपयोग करतात- त्यांना बरेच दिवस दिसून येत नाही.कित्येक वेळा हृदयविकाराचे निदान इतर काही कारणास्तव केलेल्या वैद्यकीय परीक्षेत होते. अगदी नियमित तपासणीचा भाग म्हणून ECG काढला असता त्यात काही बदल झालेले आहेत, असे लक्षात येते. कित्येक वेळा Silent Heart Attack येऊन गेला आहे, हेही समजते. अनेकवेळा ECG अगदी नॉर्मल असतो; पण त्याच व्यक्तीचा ECHO केला तर त्याच्या हृदयाची कार्यक्षमता ४० टक्क्यांनी कमी झाली आहे, असे आढळून येते. त्यानंतरची परीक्षा म्हणजे Stress Test. म्हणजे धावता धावता हृदयाची स्पंदने वाढवून काढलेला ECG . यात काही मधुमेही व्यक्ती पहिल्याच फेरीत बाद होतात. काही स्थूल व संधिवात असलेल्या मधुमेही व्यक्ती या टेस्टसाठी उभेच राहू शकत नाहीत. त्यासाठी Dobutamin Stress Test म्हणजे Dobutamine नावाच्या औषधाने हृदयाची स्पंदनक्रिया कृत्रीमरीत्या वाढवून (ECG) काढण्यात येतो आणि त्यावरून हृदयरोहिणी विकार झाला आहे, हे समजते.यानंतरची परीक्षा म्हणजे Angiography. त्यात एखाद्या मधुमेही व्यक्तीला कुठलीही ठळक लक्षणे दिसत नसतानासुद्धा ४-५ ब्लॉक्स आहेत, हे कळल्यानंतर सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसतो.कित्येक वेळा ‘मला काहीही होत नव्हते, पण रुटीन मेडिकल चेकमध्ये डॉक्टरांनी काहीतरी शोधून काढले. उगाचच मी या लफडय़ात पडलो,’ वगैरे विधाने कानावर पडतात. पण चाणाक्ष आणि सूज्ञ व्यक्ती मात्र, आपल्याला वेळीच धोक्याची सूचना मिळाली, याचा फायदा उठवावा असे मानून अॅंजिओप्लॅस्टी किंवा बायपास सर्जरीच्या सोहळ्याची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तयारी सुरू करतात. काही मंडळी या वास्तवाकडे दुर्लक्ष करतात किंवा इतर अवैज्ञानिक मागार्ंचा अवलंब करतात. त्यातील काही अभागी व्यक्ती हृदयविकाराच्या शिकार होतात आणि पस्तावतात. काही निश्चयी मधुमेही मात्र कठोरपणे आपली जीवनशैली बदलून निरोगी राहू शकतात. परंतु ही जीवनशैली किती काळ टिकवू शकतील याचा भरवसा नसतो. अॅंजिओप्लॅस्टी किंवा बायपास सर्जरी मुळे अनेक मधुमेही व्यक्तींना जीवनदान मिळाले आहे, यात शंकाच नाही.रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणास Endothelium असे म्हणतात. या अंत:स्थरावर अनेक प्रकारचे आघात होत असतात. त्यात सर्वात अधिक आघात म्हणजे Oxidative stress. आपल्या शरीरात सतत Oxygenfree radicals बनत असतात. हे पदार्थ अंत:स्थरावर इजा करतात व त्यावर कोलेस्टरॉलमधील कमी घनतेचे कोलेस्टरॉल (LDL-C) च्या कणांना Oxidised करून या थरावर पापुद्रे टाकू लागतात. त्यामुळे रक्तवाहिन्या आतून खराब होऊ लागतात. वाढलेली रक्तशर्करा LDL -कोलेस्टरॉल, Triglyceride नावाची मेदाम्ले हे थरावर थर टाकण्याचे काम करतात. वाढलेल्या रक्तदाबामुळेसुद्धा एडोथेलियमला इजा होते व त्यात रक्त गोठविण्यास मदत करणाऱ्या प्लेटलेट जमून रक्ताची व मेदाम्लेची एक गुठळी तयार होऊन, Atherothombosis होऊन, रक्तवाहिनी बंद पडू शकते. रक्तशर्करा अनियंत्रित असेल तर छऊछ व ट्रायग्लिसराईड वाढतात. रक्तामध्ये एक चांगले कोलेस्टरॉल असते जे कमी घनतेच्या कोलेस्टरॉलची पातळी कमी करते त्यास LDL कोलेस्टरॉल असे म्हणतात. त्याची निर्मितीसुद्धा अनियंत्रित रक्तशर्करेमुळे कमी होते. थोडक्यात म्हणजे वाढलेली रक्तशर्करा हे या सर्व व्याधींचे मूळ कारण आहे आणि तिचे नियंत्रण करणे हा एक महत्त्वाचा उपचार आहे.वाढलेल्या रक्तशर्करेबरोबरच वाढलेले LDL कोलेस्टरॉल, ट्रायग्लिसराईड आणि कमी झालेले HDL कोलेस्टरॉल हेसुद्धा महत्त्वाचे रिस्क फॅक्टर्स समजले जातात आणि त्यावर उपचार करणे तितकेच महत्त्वाचे असते.रक्तशर्करा जर नियंत्रित नसेलतर दुरुस्त केलेल्या हृदयरोहिण्यांवर लवकरच आघात होतो आणि त्या पहिल्यापेक्षा लवकर बंद पडू शकतात. याला Reoclussion असे म्हणतात. मधुमेही व्यक्तींमध्ये Reoclussion अधिक प्रमाणात आढळून येते.बायपासनंतर रुग्ण ICU मध्ये असताना रक्तशर्करेची पातळी सदैव १४० मि. ग्रॅमच्या खाली ठेवण्याची तारेवरची कसरत करण्यासाठी हृदयविकार इस्पितळात किंवा विभागात मधुमेह-तज्ज्ञांची टीमच कार्यरत असते. शस्त्रक्रियापश्चात उपचारात रक्तशर्करा नियंत्रण हे फार महत्त्वाचे असते आणि त्यासाठी केवळ इन्स्युलिनचाच वापर होतो. दर तासातासाला रक्तपरीक्षा करण्यात येते व त्यानुसार इन्स्युलिनचा डोस ठरविण्यात येतो.रक्तशर्करा उपाशीपोटी १४० च्या खाली आणि जेवणानंतर १६० च्या खाली ठेवणे जसे महत्त्वाचे असते तितकेच रक्तातील ग्लायकोहिमोग्लोबिन, ज्याला HbA1C असे संबोधतात तेसुद्धा ७% पेक्षा कमी असावे लागते.अँजिओप्लास्टी किंवा बायपास झालेल्या मधुमेही व्यक्तींनी आता आपण बिनधास्तपणे वाटेल ते खाऊ-पिऊ शकतो, असे समजून एकदम पथ्य सोडू नये. याउलट आपली जीवनशैली बदलून आपल्याला मिळालेल्या १०-१५ वर्षांच्या वाढीव आयुष्याचा चांगल्या प्रकारे वापर कसा करता येईल, याचा विचार करावा.अॅंजिओप्लॅस्टी किंवा बायपास सर्जरीनंतर अनेक मधुमेही व्यक्ती आता पुढे काय करावे, या संभ्रमात पडतात. काय खावे, काय खाऊ नये, किती प्रमाणात व्यायाम करावा, किती परिश्रम करावेत, रिटायर व्हावे की पार्ट-टाईम नोकरी करावी, नवीन जोखीम घ्यावी की नाही, हवाईप्रवास करता येईल का, ड्रायव्हिंग करता येईल का, वैवाहिक जीवन पूर्वीप्रमाणे जगता येईल का- असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येतात, त्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता असते.मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे?ऋ नियमित रक्तपरीक्षा : स्वत:ची रक्तशर्करा रोज एकदा तरी तपासून बघावी. त्यासाठी अतिशय बिनचूक व वापरायला सोपी अशी उपकरणे मिळतात. दिवसातून निरनिराळ्या वेळी म्हणजे कधी उपाशीपोटी, कधी जेवणाअगोदर, जेवणानंतर, व्यायामाअगोदर, व्यायामानंतर रक्तपरीक्षा करून नोंदी ठेवाव्या.ऋ आपापल्या मधुमेह-तज्ज्ञांना विचारून इन्स्युलिन व गोळ्यांच्या डोसमध्ये फरक करावा. रक्तदाब मोजून तो १२०/८० या फिगरच्या जवळपास असावा. वजन व पोटाचा घेर कमी करावा. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली व्यायाम करावा. रक्तातील म्लेदाम्ले आटोक्यात ठेवावीत (LDL-C हे ८० mg % पेक्षा कमी, Triglycerides हे १२० पेक्षा कमी आणि HDL-C हे ४५ च्या वर असावे.) आज या सर्व रिस्क फॅक्टरपेक्षा सर्वात महत्त्वाचा व मोजण्यात सर्वात सोपा असा ‘मार्कर’ म्हणजे पोटाचा घेर. kLifeline is inversely proportional to your waist line' हे सूत्र आता जनमान्य झाले आहे आणि त्याचे अधिक महत्त्व पटावे म्हणून IDF (International Diabetes Federation) या संस्थेने पोटाचा घेर मोजण्यासाठी सर्व देशांना ‘मोजणी-टेप’ वाटण्याचे ठरविले आहे. यामुळे जनसामान्यांत स्वत:चे पोट किती मोठे आहे आणि ते कसे कमी करावे याविषया जागरूकता निर्माण होईल, ही अपेक्षा. जास्तीत जास्त पोटाचा घेर महिलांचा ८८ व पुरुषांचा १०२ सें.मी.पेक्षा जास्त म्हणजे रोगांना आमंत्रण. स्थूलपणापेक्षा स्थूलता पोटाच्या आसपास असणे अधिक हानीकारक असते. पाश्चात्य देशातील लोकांपेक्षा भारतीयांचे पोटाच्या आतील चरबीचे प्रमाण अधिक असते म्हणूनच वैद्यकीय परिभाषेत भारतीयांना Thin fat Indian असे म्हणतात आणि ही पोटातील चरबी मधुमेह आणि हृदयविकार यांसाठी महत्त्वाचा रिस्क फॅक्टर मानण्यात येतो.आहाराविषयी :आहार, विहार, विचार आणि औषधोपचार हे मधुमेहावरील उपाय योजनेच्या इमारतीचे चार स्तंभ मानले जातात. त्यात सर्वात महत्त्वाच्या स्तंभ म्हणजे आहारोपचार. योग्य आहाराने जवळजवळ सर्वच रोगांवर मात करणे शक्य असते. मधुमेही व्यक्तीने १६०० उष्मांकाचा आहार घ्यावा. त्यातील ६० टक्के कबरेदेक पदार्थ (जाडय़ा गव्हाच्या पोळ्या, भाकरी, मोड आलेल्या धान्याची उसळ, पालेभाज्या, ज्यांमध्ये चोथा जास्त असेल), ३० टक्के प्रथिने (डाळी, दूध, दही, पनीर), १० टक्के स्निग्ध पदार्थ, तेल (२ चहाचे चमचे ऑलिव्ह किंवा राईस ब्रान) २ चमचे तूप, १ चमचा लोणी मिळून पूर्ण दिवसाचा स्वयंपाक बनवावा. २ चमचे खोबरं वरून घालण्यास हरकत नाही. भात, बटाटे कमी प्रमाणात घ्यावे. बायपासनंतर बऱ्याच लोकांना बद्धकोष्टता होते. त्यासाठी खासकरून पपई/ पेरू/ अंजीर/ काळ्या मनुका या गोष्टींचा वापर करावा. रात्री दुधातून इसबगोल घेण्यासही हरकत नाही. ऑपरेशननंतर औषधांमुळे तोंडाची चव जाते. त्यासाठी आलं-लिंबू, हिंगजिरे यांचा वापर करण्यास हरकत नाही. तळलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत. गोड खावेसे वाटले तर खजुरात केलेल्या ड्रायफ्रूटच्या मिठाईचा एखादा तुकडा खाण्यास हरकत नाही. आक्रोड व बदाम रोज थोडय़ाच प्रमाणात घ्यावेत. आले, लसूण, कांदा, हिरवी मिरची यांचा समावेश आहारात असावा, त्यांच्यात अँडी ऑक्सिडंटस् असतात.‘बी12’ आणि ‘ड’ या जीवनसत्त्वांचे महत्त्व आता अधिकाधिक पटू लागले आहे. खासकरून ‘ड’ जीवनसत्त्व एका ठराविक पातळीखाली असल्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते, यावर आता अनेक लेख प्रसिद्ध झाले आहे. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मधुमेहाला पोषकता मिळते. आपल्या देशात वास्तविक भरपूर सूर्यप्रकाश असूनसुद्धा भारतीयांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता असण्याचे कारण म्हणजे हे जीवनसत्त्व त्वचेखाली बनविण्यासाठी लागणारा एक जनूक भारतीयांमध्ये कमजोर असतो, हे आता शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. केवळ हाडे ठिसूळ होणे किंवा लहान वयात मुडदूस होणे एवढेच या जीवनसत्त्वाच्या अभावाने होते असे नाही, तर मधुमेह व हृदयविकार या विकारांनासुद्धा ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे आमंत्रण मिळते असा निष्कर्ष जवळजवळ १५० संशोधनपत्रांतून वैद्यकीय शास्त्रासमोर मांडला गेला आहे. मधुमेही व्यक्तींनी आपल्या रक्तातील D3 level ची परीक्षा करून जर ती 30 mg पेक्षा कमी असेल तर ‘ड’ जीवनसत्त्वाची औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याने अवश्य घ्यावीत आणि कोलेस्टरॉलच्या भीतीने उगाचच दूध किंवा दही बंद करू नये.गेल्या काही दशकांत बहुदेशीय कंपन्यांनी भारतीयांना फास्ट फूडच्या विळख्यात जखडून टाकायला सुरुवात केली आहे. त्या विळख्यातून आपण वेळीच बाहेर येऊया.
मधुमेह तज्ज्ञ,एशिअन हार्ट इन्स्टिटय़ूट आणि रहेजा हॉस्पिटलंल्ल्र’ुँ१ं२‘ं१@ँ३ें्र’.ूे
Sunday, September 26, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
Dear Sir,
ReplyDeleteThanks for this valuable Information.
Regards,
Rajkumar